मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत आहेत की, शाहरुखची पत्नी गौरी खान मुलगा आर्यनला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचत आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आणि गौरी दोघंही आर्यन प्रकरणाबद्दल खूप नाराज आहेत. आर्यनची स्थिती जाणून घेण्यासाठी दोघंही भेटणार आहेत. आज शाहरुख आणि गौरीच्या लग्नाचा 30 वा वाढदिवस आहे. पण, आर्यन तुरुंगात असल्यामुळे ते सेलिब्रेशन करणार नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरीआधी शाहरुख 21 ऑक्टोबरला आर्यनला जेलमध्ये भेटायला गेला होता. पिता-पुत्राची ही भेट जवळपास 18 मिनिटे चालली. मात्र, नियमानुसार कारागृह प्रशासन केवळ 10 मिनिटांच्या मिटींगला सहमती देत आहे. मीटिंगदरम्यान शाहरुखला पाहून आर्यन भावूक झाला. त्यांच्यासोबत असलेल्या तुरुंगातील संत्रीने त्याला सावरलं आणि नंतर दोघं एकमेकांशी इंटरकॉमवर बोलले.


कॅबिनेटमध्ये शाहरुखने घेतली मुलाची भेट
तुरुंगातील कॅबिनेटमध्ये शाहरुखने आर्यनची भेट घेतली. काचेच्या भिंतीच्या एका बाजूला आर्यन आणि दुसऱ्या बाजूला शाहरुख होता. शाहरुखसोबत त्याच्या स्टाफमधील काही लोकंही होती. मात्र त्यांना कॅबिनेटमध्ये शाहरुखसोबत जाण्याची परवानगी नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आपल्या वडिलांना पाहून तुटून पडला आणि रडू लागला. 2 ऑक्टोबर रोजी अटक झाल्यानंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा आर्यनच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला भेट दिली.


मंगळवारी उच्च न्यायालयात जामिनावर सुनावणी होणार 
एनसीबीच्या विशेष न्यायालयाने आर्यनची न्यायालयीन कोठडी 21 ऑक्टोबरला वाढवली होती. न्यायालयाने आर्यन, त्याचा मित्र अरबाज मर्चंटसह सर्व 8 आरोपींना 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणातील आरोपी आर्यन खानला अजून उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. गुरुवारी त्यांच्या वकिलांनी दाखल केलेली याचिका स्वीकारत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 26 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत तहकूब केली. तोपर्यंत आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये राहावं लागणार आहे.