ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना असतात हे अधिकार, रेल्वेचे नियम तुम्हाला माहितीयत का?

Jul 05, 2024, 09:06 AM IST
1/8

ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना असतात हे अधिकार, रेल्वेचे नियम तुम्हाला माहितीयत का?

Indian Railway Rules for women traveling alone in trains Marathi News

Railway Rules: भारतामध्ये रेल्वेचे खूप मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यांचा हा रेल्वे प्रवास सुकर व्हावा यासाठी रेल्वे बरेच प्रयत्न करत असते. प्रवासादरम्यान खाण्यापिण्यापासून ते सिटपर्यंत कोणतीही अडचण आल्यास रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केलेयत. याने तुमचे प्रश्न लवकर सुटतो.

2/8

महिला सुरक्षा

Indian Railway Rules for women traveling alone in trains Marathi News

रेल्वे प्रवासात महिला सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे निर्णय घेत असते. 

3/8

विशेष व्यवस्था

Indian Railway Rules for women traveling alone in trains Marathi News

महिलांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केलेली आहे. ट्रेनमधून प्रवास करताना महिलांना कोणते विशेष अधिकार मिळतात? हे अनेकांना माहिती नसते. त्याबद्दल जाणून घेऊया. 

4/8

महिलांसाठी राखीव कोच

Indian Railway Rules for women traveling alone in trains Marathi News

रेल्वेने मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबा राखून ठेवला असतो. तसेच 150 किमी अंतरापर्यंतच्या उपनगरीय गाड्यांमध्येही राखीव कोच ठेवण्यात आलेला असतो. याबद्दल अनेक महिलांना माहिती नसते. 

5/8

विना तिकीट महिलांनाही अधिकार

Indian Railway Rules for women traveling alone in trains Marathi News

अनेकदा रेल्वे प्रवासादरम्यान वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांना रेल्वेतून उतरवण्यात येते. पण महिलांच्या बाबतीत असे होत नाही. रात्री एकटी प्रवास करणाऱ्या महिलेकडे रेल्वेचे वैध तिकीट नसले तरी रेल्वे कर्मचारी तिला ट्रेनमधून उतरवू शकत नाहीत. महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वेने हा नियम केला आहे.

6/8

महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष...

Indian Railway Rules for women traveling alone in trains Marathi News

महिलांच्या विशेष सुरक्षेसाठी रेल्वे सातत्याने प्रयत्न केले जातात. गरज भासल्यास त्या नियमात महत्वाचे बदल करण्यात येतात. त्याचप्रमाणे राखीव डब्यातून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची विचारपूस  केली जाते. यासाठी महिला सुरक्षा कर्मचारीही प्रवासादरम्यान तैनात असतात. 

7/8

महिलांसाठी स्वतंत्र वेटिंग लाउंज

Indian Railway Rules for women traveling alone in trains Marathi News

ट्रेनला उशीर झाल्यास किंवा रेल्वे स्टेशनवर काही वेळ घालवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र वेटिंग लाउंजची व्यवस्था करण्यात आलेली असते. रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये म्हणून अशा अनेक व्यवस्था पाहायला मिळतात.

8/8

सीट बदलता येते

Indian Railway Rules for women traveling alone in trains Marathi News

ट्रेनमध्ये महिला एकट्याने प्रवास करत असेल आणि आपल्याला मिळालेली सीट कन्फर्टेबल वाटत नसेल. तर ती यासंदर्भात टीटीई माहिती देऊ शकते. टीटीईशी महिलेला सीट बदलून देण्यास सहाय्य करतात.