मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीला गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्स प्रकरणाच्या समस्यांना सामोरं जाव लागत आहे. आधी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमुळे अनेक बॉलिवूड कलाकारांची चौकशी झाली. आता बॉलिवूडशी संबंधित नव्या ड्रग्स प्रकरणाचा खुलासा झाला आहे. एनसीबीने अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला आर्यन खानला अटक करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खान सामान्यतः प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतो. अलीकडेच तो एका क्रूज पार्टीत सहभागी झाला होता.  जिथे त्याला NCB ने ड्रग सेवनासाठी अटक केली होती. आर्यन खान बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आहे. आर्यन खान लक्झरी लाइफ स्टाइल जगतो. आर्यन खान ज्या क्रूझवर पार्टी करत होता. ती काही साधी सुधी क्रुझ नव्हती. त्या क्रूझमध्ये खूप सुविधा आहेत. या शिपवर पार्टी करण्याचं किंवा एक रात्र खालवण्यासाठी खूप किंमत मोजावा लागते. 


ही क्रूझ वॉटरवेज लीझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडची आहे. या क्रूझचं नाव आहे कॉर्डेलिया क्रूझ. या क्रूझवर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यामुळेच त्याचा आनंद घेण्यासाठी लोकं या क्रूझवर जातात. या क्रूझमध्ये तुम्हाला फूड पवेलियन मिळेल. 3 स्पेशल रेस्टॉरंट, 4 बार, फिटनेस सेंटर यासारख्या गोष्टी आहेत. स्पा, सलून देखील क्रूझच्या आत आहेत. एक कसीनो आणि एक थिएटर आहे. एक शानदार स्विमिंग पूल देखील यामध्ये आहे. नाइटक्लब, लाइव बँड आणि डिजे देखील या क्रूझमध्ये आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि वेगवेगळ्या ऍक्टीविटीज देखील आहेत .


क्रूझच्या आत असलेल्या सुविधांबद्दल थोडे अधिक तपशील पाहिले तर त्याचे कॅसिनो देखील खूप जबरदस्त आहे. असा कॅसिनो भारतात क्वचितच सापडेल. कॅसिनो बार देखील उत्तम आहे जिथे तुम्ही तुमचे आवडते पेय घेऊ शकता. 


एवढ्या सगळ्या सेवा या क्रूझवर असल्यामुळे याचं पॅकेज देखील महाग आहे. कॉर्डेलिया क्रूझच्या पॅकेजची सुरूवात 17,700 रुपये आहे. ही किंमत एका रात्रीची आहे. कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रीचे मुंबई ते गोवा टूरचे पॅकेज हे 53,100 रुपये आहेत. यामध्ये दोन लोकांचा समावेश आहे. याचप्रमाणे दोन रात्रीचा हाय सी पॅकेज 35,400 रुपये आहे.  


कॉर्डेलिया क्रूझची सुरूवात भारतात 18 सप्टेंबर 2021 रोजी होत आहे. पुढच्यावर्षी श्रीलंकेत ही सेवा सुरू केली जाणार आहे. आर्यन खान प्रकरणात एनसीबीची टीम क्रूझवर साध्या वेशात गेले होते. आर्यन खानबद्दल बोलायचे झाले तर, रविवारी त्याला एनसीबीने एका दिवसाच्या कोठडीत घेतले. आर्यन खानने एनसीबीला कबूल केले की त्याने पार्टीमध्ये ड्रग्ज केले.