मुंबई : शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी यापूर्वी आर्यनशी व्हिडिओ कॉलवर बोलले होते. तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून दोनदा व्हिडिओ कॉलवर कुटुंबाशी संवाद साधण्याची परवानगी होती. अशा स्थितीत दोघांनी आर्यनची स्थिती पाहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यनला जामीन न मिळाल्याने नाराज झाल्याचे वृत्त असून त्याने तुरुंगात सर्वांशी बोलणे बंद केले आहे. सतत जामीन नामंजूर होत असल्याने आर्यन खान देखील संतापला असल्याचं बोललं जात आहे. त्याने संवाद साधण बंद केल्याची चर्चा आहे.


दोघेही मुलासाठी काळजीत आहेत आणि तुरुंग अधिकाऱ्यांकडून त्याच्या आरोग्याविषयी माहिती घेत राहतात. शाहरुख सुरुवातीपासूनच आर्यन खानबद्दल चिंतित आहे आणि एनसीबी आणि तुरुंग अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.


आर्यन खानवरील आरोपांबद्दल बोलताना, NCB ने त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंगशी संबंधित असल्याचा खटला दाखल केला आहे.आर्यन खानची जामीन याचिका दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.


आता त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी, 26 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, त्याला कारागृहातच राहावे लागेल.