मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेत अभिनेता शाहरुख खान सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे.  शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे आर्थर जेलमध्ये आहे.  गेल्या काही दिवसांपासून न्यायालयात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. गुरूवारी सुनावणी झाल्यानंतर देखील आर्यनाला जामीन मंजूर झाला नाही. आता 20 ऑक्टोबर रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस त्याला तुरूंगात काढावे लागणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्याने, आर्यनने त्याचे आई-वडिल म्हणजेच अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानसह व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे. आर्यन संबंधित ही माहिती एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट करत दिली आहे. दरम्यान गुरूवारी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवली आहे. 


2 ऑक्टोबरला झाली होती अटक
ड्रग्स प्रकरणात 2 ऑक्टबरला आर्यन खानला अटक करण्यात आली होती. 3 ऑक्टोबरला किला कोर्टाने एक दिवासाचा रिमांड मंजूर केला. 4 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनीसीबी कोठडी सुनावण्यात आी. एनसीबी कोठडी संपल्यानंतर आर्यन खानसह इतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 


गुरूवारीही आर्यन खानला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आणखी पाच दिवस आर्यनला तुरुंगातच राहवं लागणार आहे. आर्यन खानबरोबरच अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरही 20 तारखेलाच सुनावणी होणार आहे.