मुंबई : क्रूज ड्रग्स केस प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)ला एनसीबी (Narcotics Control Bureau) कडून क्लिनचीट देण्यात आली आहे.  ड्रग्स केस प्रकरणातून क्लिनचीट मिळाल्यानंतर देखील आर्यन कोर्टाची पायरी चढला असल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यामुळे आर्यन कोर्टात का गेला असावा? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानने आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली. याचिका गुरुवारी आर्यनच्या वकिलांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली. 


दरम्यान, आर्यनकडे एनसीबीचे आरोपपत्र नाही त्यामुळे त्याचा पासपोर्ट परत करण्यात यावा. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. असं याचिकेत नमुद करण्यात आल आहे. 


न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलै ही तारीख देखील निश्चित केली आहे. ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला 28 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. या प्रकरणात आर्यन खानसह सहा जणांविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. 


सुरुवातीच्या प्रकरणात काही उणिवा आढळून आल्या आणि पहिल्या तपास पथकाकडून चुका झाल्याचं एनसीबीने मान्य केलं. आर्यनला ऑक्टोबर 2021 च्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती.