Aryan Khans Manushi Chillar Viral Video : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची मुलं ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लाइमलाईटमध्ये राहतात. त्यात त्याचा मोठा मुलगा आर्यन खानतर नेहमीच राहतो. आर्यन जिथे जातो तिथे त्याच्या मागे पापाराझी आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर आर्यननं अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी त्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी नेहमीच त्याचे चाहते प्रयत्न करताना दिसतात. आर्यन कुठेही स्पॉट झाला तरी त्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, हा व्हिडीओ चर्चेत येण्याचं कारण मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्मीसेल्फी ऑफिशिअल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ मानुषी आधीच बाहेर असल्याचे पाहायला मिळते. तर तिच्या मागून आर्यन खान जाताना दिसत आहे. आर्यन खान बाहेर येताच त्याचे बॉडीगार्ड त्याला प्रोटेक्ट करताना दिसत आहेत. अशात आता आर्यन खानच्या बॉडीगार्डनं मानुषीला बाजुला केलं. त्यासगळ्यात पडता पडता वाचणाऱ्या मानुषीला तिच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीनं वाचवले आहे. तर अनेकांनी त्यानं थेट मानुषीला धक्का दिल्याचं म्हणतं आर्यननं काय केलं आहे, असा सवाल केला आहे. तर काही नेटक्यांनी आर्यनची बाजू घेतली आहे. 



आर्यन आणि मानुषीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी आर्यनला ट्रोल करत म्हटलं की 'अरे ड्रग्स घेतो अजून काय करायचं राहिलं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'त्या ड्रगिस्टला लवकर घेऊन जाऊ द्या.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'त्यानं नशा केला आहे म्हणूनच.' आणखी एक नेटकरी म्हणाला की नेहमी नशेतच राहतो.' आर्यनची बाजू घेत एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'त्याच्या बॉडीगार्डनं कुठे धक्का दिला हे मी व्हिडीओत शोधतोय. पण मला काही मिळालंच नाही.; दुसरा नेटकरी म्हणाला की 'मला व्हिडीओत कुठेच दिसलं नाही की त्यानं तिला धक्का दिला.' 


मानुषीचं वर्कफ्रंट


मानुषी छिल्लरविषयी बोलायचे झाले तर, 2017 मध्ये मानुषीनं मिस वर्ल्डच्या किताब तिच्या नावी केला होता. 18 नोव्हेंबर 2017 रोजी चीनमधील सनाया येथे झालेल्या स्पर्धेत मानुषीनं हे विजेतेपद पटकावले. अक्षय कुमारसोबत तिने 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या ती विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाला जास्त यश मिळालं नाही. मात्र, मानुषीचं क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये तितकंच आहे.