मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. ड्रग्स प्रकरणात तो 2 ऑक्टोबरपासून तुरूंगात आहे. दरम्यान आर्यनला जामीन मिळावा म्हणून शाहरुख आणि गौरी खान सतत प्रयत्नात आहेत. वकील देखील न्यायालयात युक्तीवाद करताना दिसत आहेत. अशात आज आर्यनसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. आज आर्यनला जामीन मंजूर होईल की त्याची कोठडी आणखी वाढेल याकडे  सर्वांचं लक्ष लागलं आहे. आर्यन कधी घरी येणार यामुळे शाहरुख, गौरीसोबत खान कुटुंब आणि त्याचे मित्रमंडळी देखील प्रतीक्षेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानचे यूएस आणि यूकेचे मित्र त्याच्या जामीनाच्या प्रतिक्षेत आहेत. आर्यनच्या मित्रांनी तणाव कमी करण्यासाठी आणि त्याला जामीन मिळावा यासाठी पवित्र मंत्राचा जप करत आहेत. Nichiren Buddhism mantra- Nam Myoho Renge Kyo असं हे मंत्र आहे. या मंत्राचं जप संपूर्ण जगात वेग-वेगळ्या कारणासाठी केला जातो. 



आर्यन खानचे अनेग मित्र आध्यात्मिक आहेत. त्यांना आर्यन खानला सर्व प्रकारे मदत करायची आहे. त्याच्या मित्रांमध्ये सिनेमाचे विद्यार्थी, यूएस आणि यूकेमधील उभरते चित्रपट निर्माते आहेत. आर्यनला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यापासून परदेशात राहणारे त्याचे मित्र खूप नाराज आहेत. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष आहे.