मुंबई : भारतीय चित्रपटाच्या पार्श्वगायिका आशा भोसले यांनी त्यांच्या गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. संगीतविश्वात त्यांनी स्वतःच्या बळावर एक वेगळी जागा निर्माण केली. आज देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण आतापर्यंत आशा भोसले यांना आपण गाताना पाहिलं आहे. पण आता त्यांना डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आशा भोसले यांनी चक्क अभिनेता Hritik Roshanच्या गाण्यावर ठेका धरला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशा भोसले यांचा हा व्हिडिओ पाहून  तुम्ही देखील थक्क व्हाल. त्यांनी Hritik Roshanच्या 'कहो ना प्यर है...' चित्रपटातील गाण्यावर ठेका धरला आहे. 'कहो ना प्यर है...' चित्रपटातील  'एक पल का जीना' (Ek Pal Ka Jeena) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सांगायचं झालं तर ऋतिकने 'कहो ना प्यर है...' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 


आशा भोसले यांचा हा व्हिडिओ फार जुना आहे. एका कॉन्सर्ट दरम्यानचा हा व्हिडिओ वाटत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वसामान्स जनतेपासून कलाकारांपर्यंत अनेकांची कमेंट करत त्यांची स्तुती केली आहे. आशा भोसले फक्त गायिकाचं नाही तर उत्तम डान्सर सुद्धा आहेत.