मुंबई : फिल्म इंडस्ट्रीच्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी हजारो गाण्यांना आपला सुमधुर आवाज दिला आहे. त्यांची गाणी चाहत्यांवर कायमच जादू करतात. तर काही गाणी आशा भोसले यांच्या नावानेचं सुपरहिट व्हायची. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी आपला सुरेल आवाज मराठी, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, तामिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषेतील गाण्यांना दिला आहे. पण आशा भोसले त्यांच्या गायनासाठी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. जेवढी त्यांची चर्चा प्रोफेशनल लाईफमुळे झाली तितकीच त्यांची चर्चा रंगली पर्सनल लाईफमुळे झाली. आशा भोसले यांनी त्यांच्या आयुष्यात आणि लव्हलाईफमध्ये बराच संघर्ष पाहिला आहे. आज आम्ही तुम्हाला आशा भोसलेच्या लव्ह लाईफबद्दल काही किस्से सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 10व्या वर्षी गाण्याला सुरुवात
आशा भोसले गान कोकिळा लता मंगेशकर यांची धाकटी बहीण आहेत. आणि प्रसिद्ध क्लासिक गायक दीनानाथ मंगेशकर यांची धाकटी मुलगी. ज्याप्रमाणे दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी संगीत विश्वात आपलं नावलौकिक मिळवला. तसंच संगीत क्षेत्रात आशा भोसले यांचं नावही खूप मोठं आहे.


वडिलांच्या निधनानंतर आशा भोसले यांनी गाणं सुरू केलं. त्यावेळी त्या फक्त 10 वर्षांच्या होत्या. 1948 साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावेळी त्यांचं पहिलं गाणं 'सावन आया रे' होतं. हे गाणं 'चुनरिया' या चित्रपटामधील होतं. आशा भोसले यांनी झोहराबाई आंबळेवाली आणि गीता दत्त यांच्यासोबत हे गाणं गायलं होते.


वयाच्या 16व्या वर्षी पडल्या प्रेमात
वयाच्या 16 व्या वर्षी आशा भोसले प्रेमात पडल्या. मोठ्या बहीण लता मंगेशकर यांचे सचिव गणपतराव भोसले यांच्या आशा प्रेमात पडल्या होत्या. या लव्हस्टोरीमध्ये एक मजेशीर बाब म्हणजे आशा भोसले ह्या फक्त 16 वर्षांच्या होत्या तर गणपतराव भोसले 31 वर्षांचे होते. ज्यामुळे या दोघांच्या लग्नासाठी कोणीच तयार नव्हतं.


दोघांच्या संबंधाविषयी समजताच कुटुंबातील सदस्यांनी लग्नास नकार दिला. पण आशा भोसले यांचं गणपतरावांवर खूप प्रेम होतं. यामुळेच दोघांनीही पळून जायचं ठरवलं. दोघंही घरातून पळून गेले आणि यांनी लग्न केलं, पण हे संबंध फार काळ टिकले नाहीत. लग्नानंतर थोड्याच वेळात दोघं विभक्त झाले.


20 वर्ष राहिल्या एकट्या
आशा भोसले यांनी एका मुलाखतीत गणपतराव यांच्याशी झालेल्या लग्नाचा उल्लेख केला होता, मात्र यावेळी त्यांनी गणपतरावांच्या कुटुंबियांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, 'गणपतरावांचं कुटुंब आमचं लग्न स्वीकारत नव्हते. यामुळेच त्यांचे कुटुंबीय मला मारहाण करण्याचा प्रयत्न करीत असत. या कारणामुळे, मी माझ्या घरी परतले. त्यानंतर मी कधी गणपतरावांच्या घरी गेले नाही'. तिथूनच या दोघांचं नातं संपलं.


ज्या दिवशी आशा भोसले यांनी पती गणपतराव यांचं घर सोडलं, त्यावेळी त्या प्रेगनंट होत्या. असं म्हटलं जातं की, त्यामुळेच त्यांनी इतर कोणतंही नातं जोडलं नाही. त्या 20 वर्ष अविवाहित राहिल्या आणि त्यांनी आपल्या मुलाचं संगोपन केलं.