मुंबई : अभिजात स्वरसाजाची देणगी लाभलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. वाढतं वय आणि खालावणारी प्रकृती यांच्याशी संघर्ष सुरु असताना अखेर दीदींनी माघार घेतली आणि हा दैवी आवाज आपल्यापासून कायमचा दुरावला. (Lata Mangeshkar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीदी त्यांच्या असंख्य गाण्यांच्या माध्यमातून कायमच आपल्यात राहतील, पण त्यांचा स्मितहास्य असणारा चेहरा आता बराच दूर गेला आहे. 


दीदी गेल्या तिथेच सगळंकाही बदललं, असं असतानाच आता कुटुंब आणि अगणित चाहते त्यांच्या जाण्याच्या दु:खातून सावरताना दिसत आहेत. 


काहींनी दीदींसाठी प्रार्थना करण्यासही सुरुवात केली आहे. यामध्येच एक असा चेहरा समोर आला आहे, जो सर्वांच्या नजरा वळतोय. 


शंकराच्या पिंडीवर दूधाचा अभिषेक करताना आणि हात जोडून त्याची आराधना करताना एक तरुणी दीदींसाठी प्रार्थना करताना दिसत आहे. 


तिच्या चेहऱ्यावर असणारे शांत भाव, काहीतरी जवळचं गमावल्याची जाणीवर करुन देत आहे. तर तिच्या प्रार्थनेतून दीदींवर असणारं तिचं प्रेमही व्यक्त होत आहे. 



मंगेशकर कुटुंबाशी या तरुणीचं अगदी खास नातं. लहानपणापासूनच तिच्यावर या कुटुंबचे संस्कार झाले. 


ही तरुणी दुसरीतिसरी कोणी नाही, तर खुद्द ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची नात आहे. 



कोण आहे जनाई? 
जनाई भोसले ही, आशा भोसले यांचा मुलगा आनंद यांची मुलगी आहे. ती स्वत:सुद्धा संगीत क्षेत्रात सक्रीय आहे. '6 पॅक' या भारतातील पहिल्या तृतीयपंथी बँडच्या प्रोजेक्टवर कामही सुरु केलं आहे. 


जनाई, सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. कायमच तिनं मंगेशकर कुटुंबाची वेगळी झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे.