Ticket Price: `अशी ही बनवाबनवी` प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटाचे तिकीट किती रूपये होतं? वाचून बसेल धक्का
Ashi hi Banwa Banwi Movie Ticket in 1988: अशी ही बनवाबनवी हा चित्रपट 35 वर्षांपुर्वी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं अक्षरक्ष: इतिहास घडवला. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ (Ashi hi Banwa Banwi Box Office) ही आजही तेवढीच कायम आहे. त्यातून मुख्य म्हणजे त्यावेळी या चित्रपटानं कोट्यवधींचा गल्ला भरला होता.
Ashi hi Banwa Banwi Movie Ticket: 'अशी ही बनवाबनवी' (Ashi hi Banwa Banwi) हा चित्रपट आपण आजही आपल्या परिवारासोबत आनंदानं पाहतो. 35 वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा मराठी प्रेक्षकांना आजही पाहावासा वाटतो. कुठे टिव्हीवर हा चित्रपट लागला तर आपण तो संपुर्ण पाहिल्याशिवाय पुढे जात नाही. 23 सप्टेंबर 1988 रोजी या चित्रपटाचा पहिला शो (Ashi Hi Banwa Banwi Movie Show) लागला होता आणि त्या काळी बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. मराठी प्रेक्षक हा चित्रपट आवर्जून पाहायला जायचे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laximikant Berde), अभिनेत्री प्रिया बेर्डे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, अभिनेता सुशांत रे, ज्येष्ठ अभिनेते सुधीर जोशी अशा कलाकारांना त्यांच्या रंगदार भुमिकेमुळे या चित्रपटाला चार चांद लावले होते. जवळपास तीन दशकांपुर्वी हाऊसफुल्लचा गल्ला भरणाऱ्या चित्रपटाची टिकट प्राईज किती होती तुम्हाला माहितीये का? (Ashi Hi banwa banwi movie ticket price will shock you 35 years ago movie broke box office record entertainment news in marathi)
तीन दशकांपुर्वी आत्ताच्या ऐवढी महागाई नव्हती. तेव्हा लोकांचा पगारही (salary in 1980 in india) फारच कमी होता. अंदाजे 400-800 रूपयांपर्यंतही महिना पगार असे. तर जास्तीत जास्त 5 हजारांच्या आसपास असावा किंवा त्यातूनही कमी. त्या काळी चित्रपट करणंही खूप मोठी गोष्टी होती. आत्तासारखे सारखा जाहिरातींचा (Advertisement) भडिमारही होत नसे. ग्लॅमरही तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीत आत्ताच्यासारखे नव्हते. अशा काळात अशी ही बनवाबनवी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) इतिहास रचला होता. तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की त्या काळी करोडोंचा गल्ला भरणाऱ्या या चित्रपटाचे तिकट (ticket price) किती होते.
किती होते टिकट?
'अशी ही बनवाबनवी' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटाचे तिकीट हे खालच्या सिटींगमध्ये 3 रूपये आणि बाल्कनीचे तिकीट हे 5 रूपये इतके होते. या तिकीटावर या चित्रपटानं त्या काळात 3 कोटी रूपयांचा गल्ला भरला होता. आताच्या मानानं 3-5 रूपये म्हणजे 700-800 रूपयांच्याही वर असू शकतात. त्यामानानं 3 कोटी म्हणजे त्यावेळी अशी ही बनवाबनवी या चित्रपटानं 100 कोटींच्या वर तरी गल्ला भरला होता.
न संपणारी लोकप्रियता...
या मराठी चित्रपटानं आत्तापर्यंत प्रत्येक मराठी मनाची मनं जिंकून घेतली आहे. 'धनजंय माने इथेच राहतात का', '70 सत्तर रूपये वारले', 'हा माझा बायको', 'नवऱ्यानं टाकलंय तिला', 'लिंबू कलरची साडी' असे या चित्रपटातील गाजलेले डायलॉग्ज आहेत. आजही हे पुन्हा पुन्हा ऐकायला प्रेक्षकांना आवडतातच. मीम्सच्या (Ashi Hi Banwa Banwi Memes) रूपातही हे डायलॉज आपल्यासमोर येत राहतात. या चित्रपटातील अनेक किस्से आपल्यालाही ऐकायला आवडतात. या चित्रपटाची ख्याती 100 वर्षांनंतरही राहिल यात काहीच शंका नाही.