उद्योजक अशनीर ग्रोव्हरने (Ashneer Grover) नुकतीच बिग बॉसमध्ये (Big Boss) हजेरी लावली. दरम्यान यावेळी अभिनेता सलमान खानने (Salman Khan) अशनीर ग्रोव्हरला खडेबोल सुनावले आहेत. अशनीर ग्रोव्हरने एका पॉडकास्टमध्ये सलमान खानबद्दल काही दावे केले होते. सलमान खानने यावरुन नाराजी जाहीर करताना हे करणं योग्य नाही असं सुनावलं. यानंतर अशनीर ग्रोव्हरनेही सलमान खानची माफी मागितली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या 'विकेंड का वार'मधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सलमान खान अशनीर ग्रोव्हरला त्याने केलेल्या विधानांबद्दल विचारत आहे. ज्यामध्ये त्याने आपण सलमान खानला आपली कंपनी BharatPe चा ब्रँड अॅम्बेसिडर होण्यासाठी कशाप्रकारे विचारणा केली आणि 7.5 कोटींवरुन 4.5 कोटींवर आणल्याचं सांगितलं होतं. सलमान खानने या व्हिडीओचा उल्लेख करत माझी तुझ्यासोबत कधीच खासगी बैठक झाली नसून शोच्या टीमच्या माध्यमातून पहिल्यांदा नाव ऐकल्याचं सांगितलं. 


अशनीर ग्रोव्हरने एका पॉडकास्टमध्ये सलमान खानची टीम 7.5 कोटी मागत असताना आपण फक्त 4.5 कोटीत साईन केल्याचा दावा केला होता. तसंच आम्ही तीन तास एकत्र बसलो होतो. त्याच्या मॅनेजरने फोटो काढल्यावर त्यांना राग येतो सांगितल्याने मी फोटोही काढला नव्हता असं तो म्हणाला होता. सलमान खान त्या पॉडकास्टचा उल्लेख करत म्हणाला की, "मी तुझा एका व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये तू काही दावे केले आहेस आणि काही आकडे सांगितले असून मला इतकी रकम देऊन साईन केल्याचं सांगितलं आहेस. हे सर्व खरं नाही. असा चुकीचा आभास निर्माण करणे चुकीचे आहे". अशनीर ग्रोव्हर यादरम्यान सलमान खानला आपली चूक झाल्याचं सांगत, चुकीचा अर्थ लावल्याचं म्हणत होता.



सलमान खानला ब्रँड अॅम्बेसिडर नियुक्त केल्याने यश कसं मिळालं हे आपण सांगण्याचा प्रयत्न करत होतो असं अशनीर ग्रोव्हरने म्हटलं. तो म्हणाला की, "मला फक्त हे सांगायचं होतं की तुम्हाला आमच्या ब्रँडसाठी नियुक्त करणं हा आमचा सर्वात हुशार निर्णय होता आणि तो आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरला. माझे संभाषण फक्त लोकांना हे सांगण्यासाठी होते की तुम्हाला ब्रँड ॲम्बेसेडर बनवणे ही एक उत्तम रणनीती होती".



सलमान पुढे म्हणाला की, "ज्याप्रकारे तू आता माझ्याशी बोलत आहे, तो अॅटिट्यूड त्या व्हिडीओत दिसत नव्हता. आता आहे तो चांगला अॅटिट्यूड आहे". यानंतर अशनीर ग्रोव्हरने माफी मागत म्हटलं की, "सॉरी सर, जर तुम्हाला तसं वाटलं असेल. पण माझा तसा हेतू नव्हता".