४२ वर्षांनंतर `पांडू हवालदार` शेंटींमेंटल!
शेंटीमेंटल या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अशोक सराफ या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा हवालदाराची भूमिका करणार आहेत.
मुंबई : शेंटीमेंटल या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अशोक सराफ या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा हवालदाराची भूमिका करणार आहेत. हवालदाराचा वेष अशोक सराफ यांच्यासाठी खूप खास आहे! १९७५ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात 'पांडू हवालदार' या चित्रपटाने झाली होती. त्यात त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज ४२ वर्षानंतर ‘शेंटीमेंटल' या चित्रपटातदेखील ते हवालदारच्या किंबहुना हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहाय्यक पोलीस उप-निरीक्षकाच्या भूमिकेत येत आहेत.
'पोस्टर बॉईज' आणि 'पोस्टर गर्ल्स' या यशस्वी चित्रपटानंतर लेखक-दिग्दर्शक समीर पाटील आता 'शेंटीमेंटल' घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. २८ जुलैला प्रेक्षकांना हसून हसून मेंटल करायला 'शेंटीमेंटल' येतोय, त्याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे!
पाहा 'शेंटीमेंटल'चा ट्रेलर रिलीज