मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईमध्ये अकाली निधन झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरूवातीला कार्डीएक अरेस्टच्या धक्क्याने श्रीदेवी गेल्या असे वृत्त होते मात्र पोस्टमार्टमच्या रिपोर्टनंतर श्रीदेवींचा मृत्यू टबबाथमध्ये बुडून झाल्याचे उघड झाले.  


72 तासांनंतर भारतामध्ये आले श्रीदेवींचे पार्थिव   


श्रीदेवींचा दुबईमध्ये अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या निधनाचे नेमके कारण शोधणं हे स्थानिक कायद्यानुसार आवश्यक होते. दरम्यान श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांची चौकशी झाली. त्यामुळे श्रीदेवींचा मृतदेह कपूर कुटुंबीयांच्या हाती मिळण्यासाठी अधिक वेळ लागत होता. 


अश्रफ शेरी थामारासेरींनी केली मदत  


अश्रफ शेरी थामारासेरी हे केरळमधील गृहस्थ गेली अनेक वर्ष दुबईमध्ये स्थायिक आहेत. मेकॅनिक असणारे अश्रफ गेली अनेक वर्ष परोपकाराचे कामदेखील करतात. त्यांनी आत्तापर्यंत 38 देशाच्या 4700 मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत केली आहे.


श्रीदेवींसोबत अन्य 5 मृतदेहांना मदत केली 


अश्रफ यांनी मंगळवारी श्रीदेवी यांच्या पार्थिवासोबत अन्य 5 पार्थिव मायदेशी पाठवण्यासाठी मदत केली. संमती मिळाल्यानंतर सरकारी शवागृहामध्ये गेल्यानंतर तेथील अधिकार्‍यांना कागदपत्र देण्यासाठी  अश्रफ यांनी मदत केली. श्रीदेवींचे पार्थिवदेखील रुग्णवाहिकेतून प्रायव्हेट जेटद्वारा भारतामध्ये आणण्यात आले. 


मोफत सेवा 


44 वर्षीय पेशाने मेकॅनिक आहेत. मात्र दुबईत एखाद्या परदेशी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पार्थिव मिळवण्यासाठी नेमके काय करावे ? याची माहिती अनेकदा कुटुंबियांना नसते. अशावेळेस संबंधित कुटुंबीयांना मोफत मदत करण्याचं काम अश्रफ करतात.  या  कामातून समाधान  मिळत असल्याचे अश्रफ यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.