Prakash Jha: यावर्षी बॉलीवूडचा बॉक्स ऑफिसवरचा आलेख हा फारचं उतरता राहिला होता. 'बच्चन पांडे'पासून 'लाल सिंग चड्ढा' ते आत्ताच्या 'लायगर' या चित्रपटापर्यंत बॉलीवूडचे जवळपास सगळेच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. आमीर खानच्या लाल सिंग चड्ढावरही प्रेक्षकांनी दणाणून रोष धरला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशाच एका दिग्दर्शकानं आमीर खानवर जोरदार टीका करत बॉलीवूडच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. 


एमएक्स प्लेयरच्या 'आश्रम' या वेब सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर घणाणून टिका केली आहे. चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, ''कलाकारांना फक्त पैसे, कॉर्पोरेट्स आणि जास्त फी देऊन चित्रपट बनवता येत नाही. प्रकाश झा पुढे म्हणतात, "हिंदी इंडस्ट्रीतील लोक हिंदी भाषेत बोलतात पण ते काय बनवत आहेत? ते फक्त रिमेक बनवण्याचा विचार करत आहेत. तुमच्याकडे सांगण्यासाठी कथा नसेल तर चित्रपट बनवणे बंद करा."


प्रकाश झा म्हणतात की एखाद्या चित्रपटाचा आशय चांगला असेल तर तो नक्कीच चालेल. त्याच्या आगामी “मट्टो की शकील” या चित्रपटाचे प्रमोशन करताना प्रकाश झा म्हणतात, “चित्रपट उद्योगासाठी हा एक वेक-अप कॉल आहे. ते बकवास चित्रपट बनवत आहे आणि हे त्यांना समजले पाहिजे. केवळ कॉर्पोरेट आणि कलाकारांना भरमसाठ फी देऊन चित्रपट बनवता येत नाही. एक चांगली कथा लिहिण्याची गरज आहे, जी प्रेक्षकांना समजेल आणि त्यांचे मनोरंजनही करेल."


ते पुढे म्हणतात, "बॉयकॉटचा ट्रेंड नेहमीच होता. आता लोक सोशल मीडियावर आपली मते व्यक्त करत आहेत. त्यांनी असा चित्रपट बनवला आहे की ज्याला कोणीच प्रेक्षक जोडू शकत नाही, मग तो चित्रपट पैसे कसे कमवणार. 'व्वा, काय चित्रपट होता' असे म्हणणारे मला अजून सापडलेले नाहीत. 


शेवटी, प्रकाश यांनी आमिर खानच्या प्रयत्नांचे कौतुक केले, ते म्हणाले, "तुम्ही कठोर परिश्रम केले आहेत आणि चित्रपटासाठी सर्व प्रयत्न केले हे मला मान्य आहे, परंतु जेव्हा तुमच्या चित्रपटाचा आशय हा एकमेव घटक नसतो, तेव्हा तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुमचा चित्रपट चालला नाही."