अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठेच्या `गुलाबी`नं प्रदर्शनाआधीच कमावले `इतके` कोटी
Ashwini Bhave, Mrinal Kulkarni and Shruti Marathe Gulabi Movie : अश्विनी भावेंच्या चित्रपटानं प्रदर्शना आधीच केला हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण
Ashwini Bhave, Mrinal Kulkarni and Shruti Marathe Gulabi Movie : 'गुलाबी' या चित्रपटाची कथा ही फक्त मैत्रीची नसून त्यांच्या संघर्षाची आणि आत्मसन्मानाच्या शोधाची गोष्ट आहे. या प्रवासात श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका मुख्य आहेत. तिघींच्या प्रवासाची रंगमय झलक आपण टीझर आणि ट्रेलरच्या माध्यमातून पाहिली. त्याशिवाय जयपूरमधील विविध रंगांचे आणि सौंदर्याचे दर्शनही त्यातून घडले. आता याच चित्रपटानं प्रदर्शनाच्या आधीच एक नवा रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटान कोणता रेकॉर्ड मोडला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चला जाणून घेऊया...
मराठी चित्रपटसृष्टीत ‘गुलाबी’ चित्रपटानं नवा इतिहास रचला आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने एक कोटींचा गल्ला जमवला आहे. असा विक्रम साधणारा ‘गुलाबी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बुकिंग सुरू होताच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी आगाऊ बूकिंग केली आहे. या चित्रपटाचे प्री-बुकिंग अवघ्या एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर या विषयी बोलताना म्हणाले, “पूर्वप्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे. प्रेक्षकांचा हा पाठिंबा ‘गुलाबी’ चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही या प्रवासाचा आनंद घेत आहोत. ‘गुलाबी’ चित्रपटात मैत्री आणि स्वप्नांचा एक सुंदर प्रवास दाखवला आहे. लोकांच्या हृदयात ‘गुलाबी’नं आधीच स्थान मिळवले आहे याचा खूप आनंद होतो. प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल याची खात्री आहे.’’
व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत, अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित 'गुलाबी' या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे निर्माते आहेत. यात चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अमोल भगत या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. संगीतकार साई-पियुष यांचे संगीत चित्रपटाच्या भावनांना आणखी उजळवते, ज्यामुळे ही कथा प्रेक्षकांना अधिक भावते.