मुंबई : सोहा अली खान, ईशा देओल पाठोपाठ अभिनेत्री असिन थोट्टुमकलनेदेखिल नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायक्रोमॅक्सचे को- फाऊंडर राहुल शर्मा सोबत असिन विवाहबद्ध झाली होती. 



  'गजनी', 'ऑल इज वेल' 'खिलाड़ी 786' अशा निवडक चित्रपटांमधून असिन रसिकांच्या भेटीला आली होती. लग्न झाल्यानंतर मात्र असिन सिनेसृष्टीपासून दूर गेली होती.  
 
 राहुल शर्माने ट्विटरच्या माध्यमातून तर असिनने इंस्टाग्रामवर ही गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. असिनने आई झाल्याचा आनंद व्यक्त करताना हे माझ्यासाठी सगळ्यात सुंदर बर्थडे गिफ्ट असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला आहे. 



 असिन आणि राहुलच्या भेटीमध्ये अभिनेता अक्षय कुमारनेही महत्त्वाची भूमिका निभावली होती. हिंदी सिनेसृष्टीतील असिनच्या जवळच्या मित्रांपैकी अक्षय कुमार हा एक आहे. अक्षयनेही असिनची भेट घेऊन तिला शुभेच्छा दिल्या. तसेच असिनच्या मुलीसोबतचा फोटोदेखिल सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे.