मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौद्या हिचा लग्नसोहळा नुकताच ११ फेब्रुवारी रोजी चेन्नईत पार पडला. व्यावसायिक आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्यासोबत सौदर्या लग्नबंधनात अडकली. या लग्नसोहळ्यासाठी राजकीय नेत्यांपासून अनेक दिग्गज कलाकारांनीही उपस्थिती लावली होती. या दोघांच्या लग्नानंतर नवीन फोटोज् व्हायरल होत असतानाच एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. धनुष आणि अनिरूद्ध रविचंद्रन या दोघांचा 'कोलावरी दी' हे गाणं बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनुष आणि अनिरूद्द यांनी 'कोलावरी दी' गाणं म्हणत लग्नासाठी आलेल्या सर्व लोकांना त्यांच्या गाण्यावर थिरकायला भाग पाडलं. आपल्या रिसेप्शनवेळी सादर करण्यात येणाऱ्या या गाण्याचा विशागनही आनंद घेत असल्याचं दिसत आहे. सौदर्या रजनीकांत आणि विशागन वनानगामुडी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी मुकेश अंबानी, नीता अंबानी, बोनी कपूर, काजोल, अदिती राव हैदरी आणि इतरही अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. गेल्या वर्षी सौंदर्या आणि विशनगन यांचा साखरपुडा पार पडला होता. यामध्ये कुटुंबातील खास सदस्य सहभागी झाले होते. 







विशनगन वनानगामुडी एका फार्मास्युटिकल कंपनीचा मालक आहे. त्यानेही सिनेमांत अभिनय करून आपलं नशिब आजमावलंय. सौदर्या आणि विशनगन या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी विशनगनचा विवाह एका मॅगझीनची संपादिका कनिका कुमारन हिच्याशी झाला होता. सौंदर्या हिचा पहिला विवाह उद्योगपती अश्विन रामकुमार यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सात वर्षांनी सौदर्या आणि अश्विन यांचा २०१७ साली घटस्फोट झाला. सौंदर्याला तीन वर्षांचा वेद कृष्णा नावाचा एक मुलगाही आहे.