मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका  पादुकोण (Deepika Padukone) हिच्याबाबत नवी माहिती पुढे आली आहे. ही माहिती खुद्द दीपिकानेच आपल्या चाहत्यांना दिली आहे. आपण 12 व्या वर्षी जे केलं ते आता करु शकत नाही. हा पहिला आणि शेवटचा प्रयत्न होता, असे तिने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनयासोबतच दीपिका  पादुकोण (Deepika Padukone) तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. दीपिका  पादुकोणने तिची एक प्रतिभा सर्वांच्या नजरेतून लपवून ठेवली होती आणि ती प्रतिभा म्हणजे कविता लिहिण्याची. होय... तुम्ही बरोबर वाचत आहात. बॉलिवूडच्या या डिंपल गर्लला कविता लिहिण्याचीही आवड आहे. दीपिकाने तिची ही कविता चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


वयाच्या 12 व्या वर्षी केली कविता


दीपिका  पादुकोण हिने वयाच्या अवघ्या12 व्या वर्षी पहिल्यांदा कविता लिहिली. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही कविता शेअर केली आहे. कविता शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले- 'कविता लिहिण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न. त्यावेळी मी 7वीत होती आणि वय 12 वर्षे होते. कविता लिहिण्यासाठी फक्त दोन शब्द दिले. मी... आणि मग तो इतिहास झाला.'


दीपिकाने लिहिलेली कविता



'मी एक प्रेमळ आणि काळजी घेणारी मुलगी आहे. मला आश्चर्य वाटते की तारे किती दूर पोहोचतात. मला लाटांची गाज ऐकू येते. मी खोल निळा समुद्र पाहू शकते. मला प्रेमळ देवाचे मूल व्हायचे आहे. मी एक प्रेमळ आणि काळजी घेणारा मुलगी आहे. मी बहरलेले फूल असल्याचे भासवत आहे. देवाचे हात मला आनंद देणारे वाटतात. मी आतापर्यंत पर्वतांना स्पर्श करते.


गहराइयां' फिल्ममध्ये दिसली होती


दीपिका पादुकोण शेवटची मोठ्या पडद्यावर 'गहराइयां' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांनी काम केले होते. चित्रपटात दीपिका पादुकोणने सिद्धांत चतुर्वेदीसोबत जबरदस्त इंटिमेट सीन दिले होते. यापूर्वी दीपिका पादुकोणने '83' चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये ती पती रणवीर सिंग याच्यासोबत दिसली होती.