बॉलिवूडमध्ये लग्न सराई; आलिया-रणबीर पाठोपाठ 41 वर्षीय `हा` प्रसिद्ध अभिनेता लग्नबंधनात
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सुरू आहे
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सुरू आहे. जिथे एकीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर दुसरीकडे, सुप्रसिद्ध अभिनेता व्हीजे सायरस साहूकारनेही त्याची गर्लफ्रेंड वैशाली मल्हारासोबत लग्न केलं आहे.
VJ आणि वैशाली लग्नबंधनात
व्हीजे सायरस आणि वैशाली कायमचे एकमेकांचे झाले आहेत. दोघंही गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये सायरस आणि वैशाली खूप क्यूट दिसत आहेत.
कुटुंबीयांच्या उपस्थितीत सप्तपदी
15 एप्रिल रोजी या जोडप्याने अलिबागमध्ये सप्तपदी घेतली. कुटुंबाचा आशीर्वाद आणि मित्रांचे प्रेम यामुळे दोघंही एकमेकांचे बनले आहेत. श्रुती सेठ, मिनी माथूर, देवराज सन्याल, समीर कोचर यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक स्टार्स या लग्नाला उपस्थित होते.
मित्रांनी त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये सायरस गुलाबी रंगाची पगडी आणि पांढरी शेरवानी परिधान केलेला दिसत आहे. त्याच वेळी, वैशालीने लाल रंगाचा लेहेंगा कॅरी केला आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.