Suniel Shetty: बॉलीवूडचा अण्णा अशी ओळख असलेल्या सुनील शेट्टीच्या लाडक्या लेकीचं म्हणजे अथिया शेट्टीचं (Athiya Shetty) लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केएल राहूल (KL Rahul) आणि आथिया शेट्टी लग्नबंधनात (Athiya Shetty-KL Rahul Wedding) अडकले आहेत. खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर मोठ्या धुमधडाक्यात लग्नसमारंभ पार पडला. या लग्नाला बॉलीवूडचे मोठमोठे सेलिब्रेटी देखील उपस्थित होते. मात्र, चर्चा होती (Suniel Shetty) सुनिल शेट्टीची. (Athiya Shetty KL Rahul Wedding father Suniel Shetty look goes viral bollywood cricket marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवाहसोहळा संपन्न होताच सुनील शेट्टीने मुलगा अहानसह माध्यम प्रतिनिधींना मिठाई वाटली. यावेळी सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद दिसून येत होता. त्यावेळी आयपीएलनंतर पार्टी देणार असल्याचं सुनील शेट्टीने म्हटलं आहे. त्यावेळी त्याच्या लूकची खुप चर्चा झाल्याचं दिसून आलं. 


अंगावर पेस्टल कलरचा कुर्ता, गळ्यात रुद्राक्ष माळ, अंगावर सदरा अन् कोल्हापुरी चप्पल, असा एकदरीत अण्णाचा लूक होता. बंद गळ्याचा सदरा अण्णाला शोभून देखील दिसत होता. लग्नाला अनेक सेलिब्रेटींची मंदियाळी दिसून आली. याशिवाय अहानबद्दल बोलायचे झाले तर तो एका सुंदर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत होता.



आणखी वाचा - Athiya Shetty KL Rahul Wedding: अथिया शेट्टी झाली मिसेस KL Rahul, रोमँटिक पोस्ट केली शेअर



दरम्यान, अथिया आणि केएल राहुल (KL Rahul Athiya Shetty Wedding) फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. राहूल आणि आथियाचं लग्न साध्या पद्धतीनं पार पडलं. मात्र अनेकांना वैयक्तिक कारणांमुळे या विवाहाला उपस्थिती लावता आली नाही. रिस्पेशनला मात्र, विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. एकूण 3 हजार जणांची उपस्थिती असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.