मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी आता त्यांच्या निर्मिती उपक्रमांनी प्रादेशिक सिनेमात सुद्धा आपली छाप पाडली आहे. प्रादेशिक सिनेमातील त्यांचा पहिला चित्रपट असलेल्या 'आत्मपॅम्फ्लेट'ने 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रशंसा मिळवली आणि फिल्मफेअर मराठी 2024 मध्येही अनेक पुरस्कार पटकावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हृदयस्पर्शी कथा, विविध पार्श्वभूमीतील स्त्रियांचा जीवन साजर करण्यासाठी एकत्र येण्याच्या प्रवासाचे चित्रण करणाऱ्या झिम्मा 2 ने प्रेक्षकांच मनोरंजन केलं. नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात 'आत्मपॅम्फ्लेट'ने सर्वोत्कृष्ट मूळ कथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संपादन आणि प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले. त्याच्यासोबत स्टेजवरील कलाकार आणि क्रूचे अभिनंदन करताना निर्माता आनंद एल राय म्हणाले " आमच्यासाठी हा चित्रपट नक्कीच खूप खास आहे. हा चित्रपट बनवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा खूप सुंदर चित्रपट आहे आणि मला त्याचा खरोखर अभिमान आहे" 


चित्रपटाच्या यशाने राय यांचं निर्माता म्हणून कौशल्य तर दाखवलेच पण विविध भाषांमध्ये कथाकथनाला चालना देण्याची त्यांची वचनबद्धताही या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.  याव्यतिरिक्त आनंद एल रायच्या झिम्मा 2 ने कलर यलो प्रॉडक्शनमधील अभिनयासाठी निर्मिती सावंतला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेत (महिला) पुरस्कार देण्यात आला. तसच आनंद एल राय यांनी रोहिणी हट्टंगडीला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक निवड (महिला) पुरस्कार देऊन प्रतिभेला पाठिंबा दिला. 


अवॉर्ड शोमध्ये मोठ्या पुरस्कारांबद्दल बोलताना राय म्हणाले, “लोक 'आत्मपॅम्फलेट' आणि 'झिम्मा 2' साठी एवढं प्रेम देत आहेत हे बघून खूप आनंद होतोय. दोन्ही कथा सुंदरपणे रचल्या आहेत आणि म्हणून भविष्यात अजून उत्तम काम माझ्याकडून होत राहणार आहे" आगामी काळात आनंद एल राय " नखरेवाली, फिर आयी हसीन दीलरुबा " या दोन प्रोजेक्ट्स सोबत प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.