`आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...` मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना महाराजांचा ही उल्लेख केला आहे, नक्की तो असं का म्हणाला एकदा वाचा...
Avadhoot Gupte : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून अवधूत गुप्ते हा ओळखला जातो. त्यानं आजवर विविध गाण्यांची निर्मिती केली असून प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अवधूत गुप्ते हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नेहमीच स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असणारा अवधूत गुप्ते त्यांच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. यावेळी राजकारण आणि त्यातही महाराजांचा उल्लेख करत त्यांना तो हुकुमशाह का म्हणाला... एकदा वाचा...
लोकशाहीला विरोध का? मग राजे काय होते?
अवधूतनं ही मुलाखत 'मित्रम्हणे' या युट्यूबल चॅनलला दिली आहे. यावेळी आताच्या निवडणूकीवर बोलताना अवधूत म्हणाला, "भाजपा आणि कॉंग्रेस... कॉंग्रेसवाले म्हणतात की आता हे लोकशाही विरोधात हुकूमशाही मतदान आहे. मी कोणाच्याही बाजुनं बोलत नाही आहे. गंमत अशी आहे की जर हुकूमशाही नको असेल तर, खरंतर जे हुकूमशाह झाले त्या सगळ्यांचं देशावर खूप प्रेम होतं. त्यांच्या त्यांच्या देशासाठी... मग हिटलर असू दे. जगानं त्याला नावं ठेवली, पण देशासाठी... जग बदलणाराल तो होता. आपले महाराज त्यांनी टेकनिकली राज्याभिषेक करुन घेतला ना... ते हुकूमशाह होते, पण त्यावेळी लोकशाही ही अस्तित्वात नव्हती, म्हणून ते म्हणायचे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि जनतेचं राज्य... स्वराज्य. मग त्यानंतर पुढच्या पिढ्यांनी त्यांच्याच मुलांनी पुढे महाराज होत राहणं, ही गोष्ट त्यांनी ठरवली की आपण ठरवली? आज जेव्हा आपण बोलतो की अमूक अमूक पक्षाचं हे आहे ते घराणं आहे, त्यांच्यातलं कोणीच नाही मग ते कसं चालेल. आपल्यालाच राजा हवा असतो. आपल्यालाच एक माणूस हवा असतो. आपल्या मनातनं हुकूमशाही गेलेली नाही."
पुढे अवधूत म्हणाला, "आधी इतकी वर्षे जेव्हा लोकशाही होती, समजा कॉंग्रेसच्या राज्यात. त्यावेळी आपण अशीच स्वप्न पाहिली की एकजण येईल कोणी आणि मग सगळं स्वच्छ करुन टाकेल. आता तो कोणी एकजण आला की आपण म्हणतो की एकच का? परत आम्हाला पाहिजे. तर हे नैसर्गिक आहे. यात मला योग्य अयोग्य असं काहीचं वाटत नाही. मला याच गोष्टीचं वाईट वाटतं की आपला समाज म्हणून आणि देश म्हणून जो प्रवास सुरु आहे. त्याची गती एवढी कमी का आहे? आपण नक्कीच पुर्वीच्या लोकांपेक्षा सुजान झालो आहोत, जगाच्या बरोबर झालो आहोत. पण खरोखर आपण जगाच्या बरोबरीनं विचारांनी आहोत का? अमेरिकेच्या माणसांचा जो विचार असतो आणि आपला हा एकसारखा आहे का? आपण फक्त राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या विचार करतोय की त्यांनी आपल्यासारखे खादी कपडे घालावे आणि आपण त्यांच्यासारखे चार कोट घालावेत हे शक्य नाही. पण समाजाचा विचार करत असताना जी लोकशाही आपल्याकडे रुजायला इतका वेळ लागला, ती तितकी रुजली गेली का? मिळून जर आपल्याला 75 वर्ष झाली, तर याकाळात ती जितकी परिपक्व व्हायला हवी, तेवढी झालेली आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच येणार. त्यामुळे जर लोकशाही आणि हुकूमशाहीमध्ये मतदान होतंय, तर तुम्ही आधी विचार करायला हवा की संपूर्ण लोकशाही घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का?"