Avatar The Way Of Water Global Box Office:  'अवतार: द वे ऑफ वॉटर' या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातलाय. दिग्दर्शक जेम्स कॅमेरूनचा (james cameron) हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना खुप आवडला आहे. त्यामुळे या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर (Box Office) बक्कळ कमाई केली आहे. अवघ्या दोन आठवड्यात या चित्रपटाने इतकी कमाई केली आहे की हा आकडा एकूण तुम्हाला धक्का बसणार आहे. 


सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेम्स कॅमेरूनचा (james cameron) 'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट गेल्या 16 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना खुप आवडतोय. रिलीजच्या अवघ्या 14 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1 बिलियनची कमाई केली आहे. 2022 या वर्षात इतर कोणत्याही चित्रपटाने इतकी कमाई करता आली नाही तितकी कमाई या चित्रपटाने केली आहे. 


चित्रपटाची कमाई किती ?


मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने 14 दिवसांत एक अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 8300 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह 2022 मध्ये एक अब्ज डॉलर्सची कमाई करणारा हा चित्रपट बनला आहे.


अवतार 1 चा रेकॉर्ड मोडणार? 


जेम्स कॅमेरूनचा (james cameron) 2009 मध्ये आलेला 'अवतार' (Avatar 2) हा चित्रपट अजूनही जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरातून $2.97 बिलियन म्हणजेच सुमारे 25,000 कोटी रुपये कमावले. 'अवतार 1' चा हा विक्रम मोडणे खूप कठीण आहे, कारण कोविड महामारीनंतर सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अजूनही कमी आहे, असे व्यापार विश्लेषकांचे म्हणणे आहे.


दरम्यान जेम्स कॅमेरूनने (james cameron) प्रेक्षकांना पेंडोरा नावाच्या ठिकाणाची ओळख करून दिली. या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या सिक्वेल 'अवतार 2' मध्ये, पँडोरामध्ये राहणाऱ्या लोकांची पुढील कहाणी दाखवण्यात आली आहे.जेम्सने अवतार 3, 4 आणि 5 देखील जाहीर केला आहे. हे चित्रपट 2024, 2026 आणि 2028 मध्ये येतील. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.