मुंबई  : 'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' या प्रसिद्ध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर  ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलीचं चर्चेत आहे. अविकाने एका वर्षात १३ किलो वजन कमी करून तिला हवं तसं शरीर मिळवलं आहे.  अविका कायम अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकताचं आविकाला एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी ऑफर आली होती. पण आविकाने ती ऑफर नाकारली. आविकाच्या मते फेअरनेस क्रिम तयार करणाऱ्या कंपन्यांचं माननं आहे की गोरा वर्ण म्हणजे सौंदर्य. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आविका पुढे म्हणाली, 'प्रत्येकाने पुढे येऊन हे विचार बदलायला हवे. अशा गोष्टींचा समाजावर वाईट परिणाम होतो. ' त्यामुळे  फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींमध्ये काम करण्यात आविका कायम नकार देते. तुम्हाला सांगायचं झालं तर आविका 'बालिका वधू', 'ससुराल सिमर का' आणि 'खतरो के खिलाडी' शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. 



अविकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या मिलिंद चंदवानीला डेट करत आहे. खुद्द आविकाने तिच्या नात्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. ती कायम मिलिंदसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. शिवाय चाहत्यांच्या  संपर्कात राहाण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.