मुंबई : 'बालिका वधू' या मालिकेमध्ये आनंदी ही मध्यवर्ती भूमिका साकारत, अविका गौर हिनं बालकलाकार म्हणून सर्वांची मनं जिंकली. अविकानं उभी केलेली आनंदी प्रेक्षक आजही विसरु शकलेले नाहीत. हीच आनंदी आता चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या भन्नाट फॅशन सेन्समुळं. फॅट टू फिट असा अविकाचा प्रवास आणि तिचं बदललेलं रुप सध्या नेटकऱ्यांची दाद मिळवत आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहू वर्षभरांपूर्वी वाढत्या वजनाची समस्या तिला सतावू लागली. तिला एक प्रकारे या गोष्टीचा ताण येऊ लागला. आरशात स्वत:ला पाहून एके रात्री ती अक्षरश: रडली होती. 'मी जशी दिसत होते, ते मला आवडलं नव्हतं', असं अविका म्हणाली.   



पण आता अविकाच्या भन्नाट बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. अविका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.