मुंबई : अवनीत कौर ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अवनीतने अगदी लहान वयातच प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलंय. आजच्या काळात तिच्या चाहत्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. अवनीत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि पोस्ट शेअर करताना दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत, अलीकडेच अभिनेत्रीने पोस्टमध्ये सांगितले की तिने तिची ड्रीम कार खरेदी केली आहे.  तिने पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर आपल्या कलेक्शनमध्ये अॅड केली आहे. ही गुड न्यूज अभिनेत्रीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम सांगितली आहे. 


अवनीत कौरने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या नवीन कारसोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये अवनीतच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत आहे.



अवनीतने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी पांढऱ्या रंगाची एवढी महागडी रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हीही चकीत व्हाल.



अवनीत कौरने तिच्या कलेक्शनमध्ये 1.2 कोटी रुपयांचे वाहन समाविष्ट केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना अवनीतने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे माझ्या स्वप्नांच्या पूर्ण होण्याचे वर्ष आहे.'


छोट्या पडद्यावर नाव कमावल्यानंतर अवनीत कौर आता 'टिकू वेड्स शेरू'मधून चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.