मुंबई : काही काळापूर्वी अभिनेत्री आयेशा टाकियाचे काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. छायाचित्रांद्वारे तिने लिप सर्जरी केली असावी असं दिसून येत होत त्यामुळे तिचा लूक खूप चेंज झाला आहे.

   

या वर्षी फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री आयेशा टाकियाची काही छायाचित्रे समोर आली होती, त्यात तिचा चेहरा खूप वेगळा आणि बदललेला वाटत होता. त्यावेळी असं म्हटलं जात होत की, आयेशा टाकियाने प्लास्टिक सर्जरी केली आहे.    

पण आता आयेशाने या बातम्यांचे खंडन केले आहे.

सर्जरीपासून आयेशाने दिला नकार

आयेशाचा दावा आहे की, तिने कोणत्याही प्रकारची सर्जरी केली नाहीये आणि जे

छायाचित्रे समोर आले होते ते एडिट करून त्यात चेहरा बदलेला होता. जेव्हा आयेशा हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी आली होती तेव्हा तीला पाहणारे सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते.        

     

आयेशा टाकिया लवकरच बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. आयेशाने तिचा आगामी चित्रपट 'जिंदगी यह जिंदगी'चे एक पोस्टर तिच्या इंन्स्टाग्राम अकांउटवरही शेअर केला आहे.