मुंबई : बॉलीवुड दिग्दर्शक आर.एस.प्रसन्ना यांचा 'शुभ मंगल सावधान' त्या रिलीजला शनिवारी एक वर्ष पूर्ण झालंय. या औचित्यात यातील कलाकार आयुष्यमान खुराना आणि भूमि पेडणेकर आठवणीत रमले आहेत. भूमिने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहत आयुष्यमान, मुदित आणि सुंगधा यांचे आभार मानले. आनंद एल. राय आणि आर.एस.प्रसन्ना यांचेही तिने आभार मानले. सर्व टेक्निशियन आणि 'शुभ मंगल सावधान'च्या संपूर्ण टीमचे धन्यवाद असेही तिने पोस्टमध्ये लिहिलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूमिचा रोल दमदार आणि दुर्लक्षित महिलेचा आहे.  'सोन चिरैया' सिनेमा चंबल येथील डाकूंवर आधारित आहे. यामध्ये सुशांत सिह राजपूतही दरोडेखोरांच्या भूमिकेत दिसणार आहे. सुशांत आणि भूमि पेडणेकर दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसत आहेत. भूमि पेडणेकर एक उभरती अभिनेत्री असून अभिनयात येण्याआधी ती यश राज बॅनरसाठी सहायक दिग्दर्शकाचे काम करत होती.