मुंबई  : बॉलिवूड अभिनेता गायक आयुष्मान खुराना सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आयुष्यमान खुराना फक्त एक अभिनेताच नसून तो एक उत्तम गायक देखील आहे. प्रत्येक वेळी तो त्याच्या शब्दांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. त्याने रचलेल्या कविता चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस पडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने कोरोनाविरूद्ध लढणाऱ्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आज हम डरे हुए हैं जिवीत हैं पर मरे हुए हैं...' आयुष्यमानकडून रचण्यात आलेल्या या ओळी अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर तुफार व्हायरल झाल्या. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये कोरोना व्हायरस विरूद्ध दोन हात करणाऱ्या सर्व योद्धांसाठी ही कविता असं म्हणत आपल्यासाठी लढणाऱ्या, स्वत:चा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर असणाऱ्या पोलिस. डॉक्टर आणि नर्स यांना माझा  सॅल्युट... जय हिंद... असं लिहिलं आहे. 


दरम्यान कोरोना व्हायरसचा धोका वाढताना दिसत आहे. करोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूंची संख्या २३९ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात १०३५ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत १८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. ही माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, शनिवारी २१० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या १५७४वर पोहोचली आहे. सध्या राज्यात  ११७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.