`पुष्पा 2` नंतर रश्मिका मंदाना `या` अभिनेत्यासोबत दिसणार `थामा` चित्रपटात, सेटवरील व्हिडीओ केला शेअर
`पुष्पा 2` नंतर रश्मिका मंदान्ना लवकरच `थमा` चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना देखील दिसणार आहे. नुकताच अभिनेत्रीने सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Rashmika Mandanna : 'पुष्पा 2' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळत आहे. अशातच आता रश्मिका मंदाना लवकरच 'थामा' चित्रपटात दिसणार आहे. पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी रश्मिका मंदाना सज्ज झाली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत या चित्रपटात आयुष्मान खुराना देखील असणार आहे. नुकताच अभिनेत्रीने या चित्रपटाच्या सेटवरील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट हॉरर-कॉमेडी असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आदित्य सरपोतदार सांभाळणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान आणि अमर कौशिक करत आहेत. त्यासोबतच या चित्रपटाची कथा निरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फुलारा यांनी लिहिली आहे. नुकताच चित्रपटाशी संबंधित एक व्हिडीओ रश्मिका मंदानाने शेअर केला आहे.
रश्मिका मंदानाने शेअर केला खास व्हिडीओ
अभिनेत्री रश्मिका मंदानाने सांगितले की, आम्ही दोघेही 'थामा' चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत. 'थामा' चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, आशा आहे की तुम्ही परफेक्ट हॉलिडे साजरा करत असाल. 2025 मध्ये भेटू. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणारा 'थामा' हा चित्रपट 2025 च्या दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, आयुष्मान खुरानासह परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.
डिसेंबर महिना रश्मिकासाठी खास?
रश्मिका मंदानाने नुकतीच एक पोस्ट शेअर करताना 'अॅनिमल' च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सांगितले होते की, तिच्यासाठी डिसेंबर महिना खूप खास आहे. त्याचबरोबर तिने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एका चाहत्याची रील शेअर केली होती. ज्यामध्ये तिने डिसेंबर महिना तिच्यासाठी खूपच खास असल्याचे म्हटले होते. खूप कृतज्ञ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज झाला होता. तर 'पुष्पा 2' हा चित्रपट यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता.
'पुष्पा 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट झाला. या चित्रपटाने काही दिवसांमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. जगभरात या चित्रपटाने 1800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.