मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखचे लाखो चाहते आहेत. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसाधारण लोक नाही तर सेलिब्रिटीही आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा देखील आहे. आयुष्मान खुरानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर फोटो काढले काढला आणि शेअर केला आहे. 


पाहा काय म्हणाला अभिनेता आयुष्मान खुराना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्मान खुरानानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आयुष्मान हा त्याच्या गाडीच्या सनरुफमधून बाहेर आल्याचे दिसत असून त्यानं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. आयुष्मान येथे त्याचा आगामी चित्रपट 'अ‍ॅन अॅक्शन हिरो' (An Action Hero) च्या प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी शाहरुखच्या घरासमोरून जात असताना आयुष्माननं हा फोटो काढला आहे. या फोटोच्या ब्रॅकग्राऊंडला 'बाजीगर' या सुपरहिट चित्रपटातील गाणं सुरु आहे. तर तो दुआ मागत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत आयुष्माननं कॅप्शन दिलं की 'मन्नत से होकर गुजर रहा था, एक मन्नत मांग ली.' (Ayushmann Khurrana Instagram) 



दरम्यान, आयुष्माननं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शाहरुखसाठी असलेलं आयुष्मानचं हे प्रेम पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. नेटकऱ्यांनी आयुष्मानच्या या फोटोवर कमेंट करत त्याची स्तुती केली आहे. (ayushmann khurrana clicked photo outside shahrukh khan bungalow mannat house bandra)  


हेही वाचा : Yami Gautam Birthday: भयानक आजाराशी झुंजतेय यामी गौतम; ज्यावर कोणताच उपाय नाही


दरम्यान, 'अ‍ॅन अॅक्शन हिरो' या चित्रपटासाठी आयुष्मानने शाहरुख खानकडे अशा प्रकारे नवस मागितला आहे. आयुष्मान खुरानाचा हा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाल दाखवेल, हे आता येणारा काळच आपल्याला सांगेल. आयुष्मानचा हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.