मुंबई : सप्टेंबर संपायला आला तरी पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाही. या पावसाचा सामान्यांबरोबरच अगदी कलाकारांना देखील फटका बसला आहे. यंदा २० वा आयफा पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. आणि याच पुरस्काराला अनेक कलाकार पावसाचा बहाणा देत उशिरा पोहोचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी परदेशात होणारा हा सोहळा यंदा भारतात आणि मुंबई नगरीत पार पडला. पण मुंबईतल्या पावसाने मात्र कलाकारांना प्रचंड त्रास दिला. ग्रीन कार्पेटवर काही कलाकार वेळेत पोहोचले पण काही स्टायलिश कलाकार मात्र उशिरा आले. ज्यामध्ये या शहराला एकिकडे पावसाने झोडपून काढलेलं असतानाही कलाकारांनी मात्र तितक्याच उत्साहाने या सोहळ्याला उपस्थितीत दर्शवत त्याची शोभा वाढवली. 


यंदाच्या आयफा पुरस्काराचे सुत्रसंचालन लाडके बंधू अपारशक्ती खुराना आणि आयुष्मान खुराना यांनी केले. तर संगीत आणि फॅशन जगतातील पुरस्काराचे सुत्रसंचालन अभिनेत्री राधिका आपटे आणि अली फजलने केले. 


पुरस्कार सोहळा उत्तम पार पडला पण यावेळी सलमान खान, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, अतिशय सुंदर दिसणारी दीपिका पदुकोण, अभिनेता शाहीद कपूर त्याचा भाऊ अभिनेता इशान खत्तर आणि कायमच चर्चेत असलेली आलिया मात्र उशिरा पोहोचले. 


पाहा यांचे हे खास फोटो 



आलिया भट्टला राझीकरता सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला



सर्वोत्कृष्ठ पदार्पण अभिनेता इशान खट्टरला पुरस्कार मिळाला



अभिनेत्री रेखाने (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण हिला पुरस्कार प्रदान केला



बॉ़लिवूडचा भाई सलमान खान देखील उशिरा पोहोचला.