मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बहुचर्चित 'बागी ३' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफचा दमदार अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. टायगरच्या 'वॉर' चित्रपटानंतर 'बागी ३'ची मोठी उत्सुकता होती. अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'बागी ३'चा ट्रेलर प्रदर्शित होताच व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. यूट्यूबवर 'बागी ३'चा ट्रेलर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंगमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बागी ३'चा धमाकेदार ट्रेलर पाहून 'बागी' आणि 'बागी २' चित्रपट नक्कीच फिके वाटू शकतात. 'बागी' आणि 'बागी २'च्या जबरदस्त यशानंतर 'बागी ३'मध्ये टायगर श्रॉफ अनेक पटींना दमदार अंदाजात दिसतोय. ट्रेलरच्या सुरुवातीलाच टायगर आणि रितेश देशमुख यांच्यामधलं प्रेम समोर येतंय. आपल्या भावासाठी दुसऱ्या देशाशी लढणाऱ्या टायगरचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळतोय. ट्रेलरमधून ऍक्शन, ड्रामा, म्युझिक सर्वांचाच उत्तम मेळ साधलेला पाहायला मिळतोय.




'बागी ३' चित्रपटाची नाडियाडवाला ग्रँडसन यांनी निर्मिती केली असून अहमद खान यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या ६ मार्च रोजी 'बागी ३' चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. आता 'बागी' आणि 'बागी २' प्रमाणेच 'बागी ३'लाही प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.