मुंबई : जागतिक स्तरावर लोकप्रियतेचं शिखर गाठणारा एक चित्रपट म्हणजे 'बाहुबली'. राजामौलींच्या या चित्रपटातून दाक्षिणात्य कलाजगत गाजवणारे काही चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटाच्या निमिच्चानं सर्वांना भेचवेवी 'देवसेना' भलतीच लोकप्रियता मिळवून गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिनं ही भूमिका साकारली होती. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अनुष्का प्रत्यक्ष आयुष्यातही तितकीच निर्भीड आणि स्पशष्टवक्तेपणा जपणारी आहे.


चित्रपट वर्तुळामध्ये चालणारं कास्टिंग काऊच तिनंही नाकारलं नाही, किंबहुना आपण आतापर्यंत अशा प्रसंगाला सामोरे गेलं नसल्याचंही तिनं सांगितलं.


चित्रपटांच्या दुनियेत पडद्यामागे घडणाऱ्या या गोष्टीबद्दल तिनं स्वत:चे विचार सर्वांपुढे मांडले. 


मी कायम स्पष्टवक्तेपणाने आपली मतं मांडली आहेत. मुळातच एका अभिनेत्रीने हे स्वत: ठरवलं पाहिजे की त्यांना सोपा आणि कमी मेहनतीचा मार्ग हवा आहे की, कठीण वाट.... 


तो निर्णय त्यांनीच घ्यावा, की जास्त मेहनत करून तुम्हाला या वर्तुळात आपलं स्थान प्रदीर्घ काळासाठी ठेवायचं आहे का.... 


आपल्या या वक्तव्यासोबतच अनुष्कानं तेलुगू चित्रपट विश्वातील कास्टिंग काऊचची प्रकरणं नाकारली नाहीत.


मुळात फक्त तेलुगूच नव्हे, तर इतरही कला विश्वांमध्ये कास्टिंग काऊचच्या  घटना घडल्या आहेत. आजवर अनेकांनीच याविरुद्ध आवाजही उठवला आहे. 


अनुष्काचं हे वक्तव्यसुद्धा सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे.