मुंबई : बाहुबली 2 हा सिनेमा गेल्या वर्षाचा ब्लॉक बस्टर सिनेमा ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाने सगळे विक्रम मोडत एक नवा इतिहास रचला. या सिनेमांतील प्रमुख पात्राला लोकांना अगदी एका रात्रीत स्टार बनवलं. सिनेमाचे दिग्दर्शक एस रामामौलीच्या या संकल्पनेला लोकांनी बॉक्स ऑफिसवर बाहुबली बनवलं. मात्र या सिनेमातील बाहुबली म्हणजे अभिनेता प्रभासने मोठा खुलासा केला आहे. 


असं का म्हणाला प्रभास?


प्रभासच्या मते तो पुन्हा बाहुबली होणार नाही. 2015 मध्ये बाहुबली या सिनेमाने कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा प्रश्न विचारला. आणि याचं उत्तर 2017 मध्ये रिलिज झालेल्या बाहुबली 2 या सिनेमांत मिळालं. या वर्षात या सिनेमांची झिंगच प्रेक्षकांवर चढली. प्रत्येकजण या सिनेमाच्या सिक्वलची आतुरतेने वाट पाहत होता. याचप्रमाणे आता प्रेक्षक बाहुबलीच्या तिसऱ्या सिक्वलची वाट पाहत आहेत. मात्र तिसऱ्या भागात प्रेक्षक बाहुबली म्हणून प्रभासला बघू शकत नाहीत. 


न्यूज एजन्सी भाषाने दिलेल्या माहितीनुसार, प्रभासने सांगितले की, हा सिनेमा खरंच चांगला होता. पण यापुढे मी असा सिनेमा करू शकत नाही. हे माझ्या करिअरसाठी चांगल नाही. हा सिनेमा माझ्या करिअरसाठी मोठी रिस्क होता. कारण या सिनेमासाठी तब्बल मी माझे 5 वर्ष दिले. महत्वाचं म्हणजे 
या सिनेमासाठी प्रभासने 5 वर्षात इतर कोणतेही सिनेमे घेतले नाहीत. या सिनेमासाठी त्याने आपल्या डाएटवर भरपूर खर्च केला. पुढे प्रभासने सांगितलं की, अभिनेत्याकडे फार कमी वेळ असतो. त्यामुळे मी यापुढे एका सिनेमाला 5 वर्ष देणार नाही. आणि जर मी इतका वेळ देतो तर मी त्यासोबत माझे दुसरे प्रोजेक्ट देखील सुरू ठेवेन. आणि हेच माझ्या करिअरसाठी चांगल आहे.