COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बाजी या झी मराठीच्या नवख्या मालिकेच्या ८ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात रोमांचकतेने झाली. रात्रीच्या अंधारात पहारा करत असताना बाजी आपला खंजीर हातात घेऊन हिराच्या आठवणीत हरवून जातो. तेवढ्यात परशा तेथे येतो आणि हरवलेला बाजी अचानक परशाच्या चाहुलीने भानावर येऊन परशावर तलवार उगारतो. दरम्यान परशा एका देवदर्शनाला आलेल्या म्हाताऱ्याला नदीपल्याड सोडल्याचे बाजीला सांगून पुन्हा दोघेही आपापल्या जागेवर पहाऱ्यासाठी निघून जातात. भर रात्री शेरा मंदिराच्या आवारात मावळ्यांची नजर चुकवून आता येतो, त्याची हलकीशी चाहूल बाजीला लागते. पण सगळीकडे शोधूनही काही सापडत व दिसत नाही म्हणून आपल्याला हिराचे भास होत आहेत असे समजून बाजी देवळात शिरण्याच्या मुख्य पायरीवर बसतो आणि हिराच्या आठवणीत रमून जातो.


दरम्यान हिराच्या आठवणीत हरवलेल्या बाजीची नजर चुकवून शेरा मंदिरात चिंतामणी हार चोरण्यासाठी शिरणार एवढ्यात मागून त्याला कोण आहे अशी आरोळी देत बाजी हटकतो. बाजीची आरोळी ऐकून शेरा गुप्ती काढून बाजीवर धावून जातो. दोघांमध्ये घनघोर लढाई होते. लढाईत बाजी शेरावर भारी पडतो. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या मर्द मराठ्याच्या तलवारीचा घाव शेराच्या मस्तकावर होणार एवढ्यात शेराच्या मदतीला त्याचा भाऊ लोआ येतो आणि बाजीच्या तलवारीचा घाव आपल्या तलवारीवर घेऊन उलट वार करणार एवढ्यात बाजीच्या मदतीला परशा धावून येतो आणि चौघात पुन्हा भयंकर लढाई सुरु होते. दरम्यान परशा जवळ लढता लढता लोआला कळते की बाजी आता शेराला पकडणार आहे हे पाहून परशाला जोराने ढकलून लोआ बाजीवर चाल करतो. बाजीला लोआने व्यस्त ठेवल्याचा फायदा घेऊन शेरा मंदिरातून पळ काढतो आणि लोआ बाजी करवी पकडला जातो. शेरा तलावात उडी टाकून पळतोय हे पाहून परशाही त्याच्या मागून तलावात उडी घेतो. दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिरात पूजारी देवाच्या पूजेला येतात आणि चिंतामणी हार चोरीला गेल्याने मोठ्याने धावा धावा अशी बोंब उठवतात.


दरम्यान हार चोरीला गेल्याने गावकरी आणि स्वतः कोतवाल बाजी सोबत गणपती मंदिरात गोळा होतात. ते पाहून बिनीवाले सरदार कोतवालांना चोरी झालीच कशी याचा जाब विचारतात. पण माझ्या मावळ्यांनी प्राण पणाला लावून एक चोराला पकडले आहे असे सांगून बिनिवाल्या सरदाराला कोतवाल गप्पा करतात. काहीही होवो पण गजाननाने दिलेल्या पेशव्यांवरील या संकटाचे वादळ आम्ही झिडकारल्याशिवाय राहणार नाही मग प्राण गेले तरी बेहत्तर. असे सांगून कोतवाल बिनीवाले सरदाराला शांत करून गजानना पुढे झाल्या अपराधाची माफी मागून लवकरच आपला चिंतामणी हार आपल्या गळ्यात घालू अशी शपत घेतात. दुसऱ्या दिवशी तलावात उतरलेल्या हिराबाईला गणेशाचा चिंतामणी हार मिळतो आणि ती मंदिराबाहेर उभ्या असलेल्या मावळ्यांची नजर चुकवून बाजूला असलेल्या झोपडती शिरते. दरम्यान एका मावळ्याची दिवंडी तिच्या कानावर पडते. ऐका ऐका ऐका, गणेशाचा चिंतामणी हार चोरीला गेला आहे, ज्या कुणाकडे तो मिळेल त्याचे भर चौकात मुंडके उडवले जाईल. हे ऐकून झोपडीत लपलेली हिरा फार घाबरून जाते. आपल्याला मिळालेला चिंतामणी हार हिरा परत करेल का आणि हिराकडे चिंतामणी हार आहे हे कळल्यावर कोतवाल हिराचे मुंडके उडवेल का? दरम्यान हिरा संकटात सापडलेल्या आपली प्रिय सखी हिराला बाजी कसे वाचवेल हे बघण्यासाठी बाजी या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.