मुंबई : सिनेमांमध्ये अथवा मालिकेत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्रींना कॉम्प्रोमाईज करावाचं लागतो. याबाबत अनेक अभिनेत्रींनी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या अनेक मुलाखतीत याबाबतचे खुलासे केले आहेत. आता आणखीण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेत काम मिळावे यासाठी कॉम्प्रोमाईज करावा लागणारा एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ही घटना एकूण अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाल शिव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिव्या पठानिया दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. या शिव्या पठानियाला तिच्या करीअरच्य़ा सुरुवातीला अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. एका निर्मात्याने तिला काम देण्यासाठी (सेक्शुअल फेव्हर) शरीरसुखाची मागणी केल्याचा वाईट अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितलाय. 


हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिव्याने सांगितले की, हमसफर शो बंद झाल्यानंतर शिव्याकडे 8 महिने काम नव्हते. हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. या दरम्यान तिला एका ऑडिशनसाठी कॉल आला होता. या ऑडिशनमध्ये शिवासोबत जे घडलं त्याने तिला मोठा धक्काच बसला. 


शिव्या मुलाखतीत पुढे म्हणाली की, मला मुंबईतील सांताक्रूझ येथे ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. मी त्या खोलीत शिरले जी खूप लहान होती. तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने (जो स्वत:ला निर्माता म्हणत होता ) त्याने सांगितले, जर तुम्हाला ही जाहिरात एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत करायची असेल, तर तुम्हाला कॉम्प्रोमाईज करावी लागेल, असे त्याने म्हटले


शिव्या पुढे म्हणते की, त्या दरम्यान घडलेली एक गोष्ट मी विसरू शकत नाही, ती म्हणजे त्याच्या लॅपटॉपमध्ये हनुमान चालीसा चालू होती. त्यावेळी मी हसायला लागले. मी त्याला म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? तुम्ही भजन ऐकत आहात आणि काय म्हणत आहात? असा प्रतिप्रश्न तिने त्याला केला होता.  


मैत्रिणींना दिला सल्ला 
दरम्यान अनेक वर्षांनी शिव्याला नंतर कळाले की, जो स्वतःला निर्माता म्हणवत होता तो खोटा आहे. शिव्याने तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांना त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले. तसेच त्या व्यक्तीच्या फंदात पडू नये असा देखील सल्ला दिला. 


करीअर 
शिवाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. एक रिश्ता पार्टनरशिप, ये है आशिकी, राधा कृष्णा, लाल इश्क, विक्रम बेताल, राम सिया आणि लव कुश या मालिकेत तीने भूमिका केली आहे.  


शिव्याचे सोशल मीडियावर खुप प्रसिद्ध आहेत. इंन्स्टाग्रामवर तिचे 330K फॉलोअर्स आहेत.