35 वर्षं वेगळे राहिल्यानंतर Kareena आणि Karishma चे आई-वडील आले एकत्र? लग्नाच्या 17 वर्षानंतर झाले होते विभक्त
Kareena Kapoor आणि Karishma Kapoor चे आई-वडील 35 वर्षानं येणार एकत्र... रणधीर कपूर आणि बबीता कपूर यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या मुली करीना कपूर खान आणि करिश्मा कपूरला प्रचंड आनंद झाला आहे. आता रणधीर कपूर आणि करिश्मा कपूर हे दोघं वांद्रे परिसरात एकत्र राहणार आहेत.
Babita And Randhir Are Back Together after 35 Years : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांचे आई-वडील बबीता (Babita Kapoor) आणि रणधीर कपूर (Randhir Kapoor) गेल्या अनेक वर्षांपासून लांब राहत आहेत. रणधीर आणि बबीता यांना विभक्त होऊन जवळपास 35 वर्षे झाली आहेत. त्या दोघांनी घटस्फोट घेतला नव्हता मात्र, ते एकत्र राहत देखील नव्हते. दरम्यान, आता अशी बातमी समोर आली आहे की बबीता आणि रणधीर हे वांद्रे येथे असलेल्या एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आहेत. आता ते दोघं एकत्र राहणार असून म्हातारपणा एकमेकांची साथी बनणार आहेत. आई-वडील एकत्र आल्यानं करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघांनाही आनंद झाला आहे.
रणधीर आणि बबीता हे नुकतेच एकत्र शिफ्ट झाले नसून त्यांना शिफ्ट होऊन जवळपास 7 महिने झाल्याचे म्हटले जात आहे. पण त्यांनी ही गोष्ट पापाराझींपासून लपवून ठेवली होती. या आधी रणधीर चेंबूरमध्ये राहत होते तर बबीता यांच्यासोबतच राहण्यासाठी रणधीर यांनी वांद्रे येथे नवीन फ्लॅट घेतला. इतकी वर्षे चेंबुरच्या घरी राहिल्यानंतर आता त्यांना नवीन ठिकाणी अॅडजेस्ट करणं खूप कठीण झालं होतं. (Babita And Randhir Are Back Together)
हेही वाचा : Akshay Kumar आणि नोरा फतेहीचा 'ऊं अंटावा' वर डान्स पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
रणधीर आणि बबीता कधी झाले होते विभक्त?
रणधीर आणि बबीता यांचे लग्न 1971 साली झाले होते. रणधीर कपूर यांच्याशी लग्न करण्यासाठी बबीता यांनी त्यांचं फिल्मी करिअर सोडलं. मात्र, लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्यात वाद होऊ लागले आणि 1988 साली ते दोघं वेगळे राहू लागले. अशात बबीता यांनी करिश्मा आणि करीनासोबत आरके बंगला सोडून दुसरीकडे रहायला गेल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा विचार कधीच केला नाही.
कशी झाली होती त्यांच्या Love Story ची सुरुवात?
‘कल आज और कल’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात मैत्री झाली आणि मग हळू हळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांचं कुटुंब या लग्नाच्या विरुद्ध असताना देखील त्यांनी लग्न केलं.मात्र, रणधीर कपूर यांनी लग्नाआधी बबीता यांच्यासमोर एक अट ठेवली होती. ती अट म्हणजे लग्नानंतर चित्रपटसृष्टीत काम करायचं नाही. इतकंच काय तर कपूर कुटुंबात कोणतीही मुलगी ही बॉलिवूडमध्ये काम करायची नाही. मात्र, त्याला ही बबीता यांना मोडीत घालत त्यांच्या दोन्ही मुलींना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास प्रेरित केले.