Akshay Kumar आणि नोरा फतेहीचा 'ऊं अंटावा' वर डान्स पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

Akshay Kumar आणि नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नोरा आणि अक्षयला 'ऊं अंटावा' या गाण्यावर डान्स करताना पाहून सगळ्यांना धक्काबसला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला ट्रोल केले आहे. अशा परिस्थितीत नेटकऱ्यांनी त्याला शाहरुख खानची आठवण करून दिली आहे. 

Updated: Mar 5, 2023, 12:33 PM IST
Akshay Kumar आणि नोरा फतेहीचा 'ऊं अंटावा' वर डान्स पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... title=

Akshay Kumar and Nora Fatehi Dance On Oo Antava Song : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा' या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटातील 'ऊं अंटावा' (oo Antava) या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं होतं. आजही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर लोक नाचत असल्याचे आपण पाहतो. या गाण्यात अल्लू अर्जुनसोबत लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) दिसली होती. या गाण्याचे क्रेझ आजही कमी झाले नाही त्याचे क्रेझ सेलिब्रिटींना देखील आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल असं कसं... तर आता या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि खिलाडी कुमार अक्षय कुमारनं (Akshay Kumar) डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही तिच्या डान्सिंग स्किलसाठी ओळखली जाते. तर खिलाडी कुमार हा त्याच्या एनर्जेटीक परर्फोर्मेंससाठी ओळखला जातो. या दोघांनी आता अल्लू अर्जुन आणि समांथा रुथ प्रभूच्या 'ऊं अंटावा' या गाण्यावर डान्स केला होता. त्या दोघांनी अटलांटामध्ये हा परफॉमन्स केलायं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी त्यांची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षयला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, 'यावर तुम्हाला कळू शकतं की अक्षयवर किती वाईट परिस्थिती आली आहे. लेटेस्ट सगळे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. आता तो दुसऱ्या कलाकारांच्या गाण्यावर डान्स करतोय. कोणताही मोठा कलाकार असं करत नाही. शाहरुखकडे बघ तो असं कधी करत नाही... त्यानं अजून असं काही केलं नाही...' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'ही स्टेप फक्त अल्लू अर्जुन चांगल्या प्रकारे करू शकतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पुन्हा एकदा एका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कॉपी करत आहेत.' 

हेही वाचा : Urfi Javed ने खरेदी केली दुसरी गाडी! स्वत: साठी नाही तर...

दरम्यान, लवकरच अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'पुष्पा' या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर अनेक रेकॉर्ड मोडले होते. लॉकडाऊन नंतर प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे.