मुंबई : दंगल सिनेमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रत्येकाने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या सिनेमातील चाईल्ड आर्टिस्टला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. तुम्हाला या सिनेमातील छोटी बबिता (Babita Kumari Phogat) आठवतच असेल. जिचं खरं नाव सुहानी भटनागर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दंगल'मध्ये छोटी बबिता हे कॅरेक्टर निभवणारी सुहानी भटनागर आता बरिच मोठी झाली आहे. एवढंच नव्हेतर तिच्या दिसण्यात खूप बदल झाले आहेत. ती खूपच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर तिचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोत सुहानी (Suhani Bhatnagar) ला पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, ही दंगल सिनेमातील छोटी बबिता आहे. हा फोटो पाहून सगेळच जण आश्चर्यचकित होत आहेत.  


हा फोटो पाहिल्यानंतर बरेच लोकं आश्चर्यचकित होत आहेत. कारण ही चाईल्ड आर्टिस्ट एवढी मोठी झाली आहे की, तिला ओळखणंही कठिण झालं आहे. आता ही छोटी सोज्वळ अभिनेत्री खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड झाली आहे. तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण होत आहेत. दंगल (Dangal)  सिनेमात ती एक्टिंग बरोबरच कुस्तीचं प्रशिक्षण घेताना दिसली होती. या सिनेमातील तिचा अभिनय पाहून सगळेच हैराण झाले होते. तिचा हा लूक पाहून चाहत्यांना घाम फुटत आहे.  



फोटो व्हायरल
तिने तिचा हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. २०१६ मध्ये दंगल सारख्या सिनेमातून डेब्यू करणारी सुहानीला ओळखणंही खूप कठिण आहे. बरेच लोकांनी दंगलमधील तिचा अभिनय पाहून तिचं कौतूक केलं होतं. आता अभिनेत्रीचे असे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
 
बिग स्क्रिनवर अमिर खानच्या  'दंगल' बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हरियाणाचे कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता फोगट यांच्यावर आधारित 'दंगल' हा एक बायोपिक सिनेमा आहे. आमीर खानची निर्मीती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केलं.  हरियाणाच्या एका छोट्याशा गावाची ही गोष्ट आहे. 'दंगल'नं बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला. आमीर खाननं दंगल चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार मानले होते.