शॉर्ट ड्रेसमधील बबिताच्या डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा
टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो `तारक मेहता का उल्टा चष्मा` गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोमधील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'बबिता जी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अशा परिस्थितीत मुनमुन दत्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती सनी लिओनीच्या 'पंघट' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या डान्स मूव्ह्स चाहत्यांना वेड लावत आहेत. व्हिडिओमध्ये मुनमुनने सिल्व्हर कलरचा शॉर्ट शिमरी ड्रेस परिधान केला आहे.याचसोबत मुनमनने न्यूड मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत. चाहते मुनमुनचं भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. मुनमुनचे चाहते तिच्या व्हिडिओंवर सतत प्रतिक्रिया देत असतात.
मुनमुन दत्ता अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या ६.६ मिलीयन पेक्षा जास्त आहे. मुनमुन केवळ शोमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप स्टायलिश आहे. चाहत्यांना तिची स्टाइल आणि लूक खूप आवडतात. शोमध्येही 'बबिता जी' आणि 'जेठालाल'ची जुगलबंदी लोकांना प्रचंड आवडते.