मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही शोमधील पात्रांनी लोकांच्या मनात घर केलं आहे. यातलं प्रत्येक पात्र लोकप्रिय आहे. कथेचा विचार केला तर बबिता जी आणि जेठालालची अधुरी प्रेमकहाणी आपण कशी विसरू शकतो. या दोघांची तोंडओळख कथा लोकांना आठवते. पण बबिता जीच्या म्हणजेच मुनमुन दत्ताच्या मनात दुसरंच कोणीतरी असल्याचं दिसत आहे आणि सध्या त्याच व्यक्तीसोबत बबिता जीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो शाहरुख खान आणि मुनमुन दत्ताचा आहे. मुख्य म्हणजे समोर आलेल्या फोटोमध्ये शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. आणि यामुळेच शाहरुखचे चाहते चिंतेत दिसत आहे. पण आम्ही आता तुम्हाला या फोटोमागील सत्य सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखसोबत मुनमुन
तारक मेहताच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये शाहरुख खान हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे आणि मुनमुन दत्ता त्याच्या शेजारी नर्सच्या गेटअपमध्ये दिसत आहे. शाहरुख खानला पेशंटच्या भूमिकेत पाहून मुनमुन खूप खूश दिसत आहे. मात्र शाहरुखचे चाहते चिंतेत दिसत आहेत. पण तुम्हाला आता चिंता करण्याची काहिच गरज नाही. कारण हा फोटो एक जाहिराती दरम्यानचा आहे. मुनमुनच्या चेहऱ्यावरचं हास्य स्पष्टपणे सांगतं आहे की, ती शाहरुखसोबत काम करताना ती किती आनंदी आहे.



जाहिरातीत एकत्र काम केलं
 खरंतर हा फोटो फार जुना आहे.  ही एक पेनची जुनी जाहिरात आहे आणि त्यात दोघांनी एकत्र काम केलं आहे. या जाहिरातीत शाहरुख खानने पेशंटची भूमिका साकारली होती आणि मुनमुन दत्ता नर्स बनली होती. पायाचं हाड तुटल्यामुळे शाहरुख बेडवर पडून आहे. मुनमुन किंग खानच्या पायावर लावलेल्या प्लास्टरवर पेन घेऊन सही करताना दिसत आहे.