अक्षय कुमारच्या `या` चित्रपटावर संपूर्ण बच्चन कुटुंबाचा होता आक्षेप! जया यांनी थेट निर्मात्यांना कॉल केला अन्...
Amitabh Bachchan-Akshay Kumar : बच्चन कुटुंबानं का घेतला होता अक्षयच्या `या` चित्रपटावर आक्षेप...
Amitabh Bachchan-Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, क्रिती सेनन आणि अरशद वारसीचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट सगळ्यांना माहितीये. या चित्रपटाला जास्त लोकप्रियता मिळाली नाही. पण तुम्हाला सगळ्यांना आठवण आहे का की जेव्हा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा या चित्रपटाचं नाव असं काय आहे असा विचार सगळ्यांना पडला होता. तर चित्रपटाच्या नावावरून बच्चन कुटुंबानं आक्षेप असल्याचं म्हटलं होतं. बच्चन कुटुंबाला चित्रपटाचं नाव मुळीच आवडलं नव्हतं. जेव्हा त्यांना या चित्रपटाचं नाव कळालं तेव्हा त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना देखील कॉल केला होता. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे प्रकरण...
टाइम्स नावच्या सुत्रांनुसार, त्यांना ही माहिती मिळाली की जेव्हा जया बच्चन यांनी अक्षय कुमारच्या या चित्रपटाचं नाव ऐकलं होतं तेव्हा त्यांनी स्वत: चित्रपटाचे निर्माता साजिद नाडियाडवाला यांना फोन केला होता. जया यांनी साजिद यांना सांगितलं की चित्रपटासाठी त्यांच्या टोपण नावाचा चुकीचा वापर करण्यात आला, हे फार चुकीचं आहे. इतकंच नाही तर जया यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधी चित्रपटाचं नाव बदलण्यास देखील सांगितलं होतं. दरम्यान, साजिद यांनी असं करण्यास नकार दिला. साजिद यांनी जया यांना सांगितलं की आता काही करु शकत नाही कारण चित्रपट प्रदर्शनासाठी काहीच दिवस राहिले आहेत. मात्र, जया बच्चन यांचं बोलणं ऐकल्यानंतर निर्मात्यांनी त्यांचा मान राखण्यासाठी बच्चन पांडेच्या स्पेलिंगमध्ये बदल केले. यासाठी आधी (Bachchan Pandey) अशी स्पेलिंग लिहिण्यात आली होती तर त्यानंतर (Bachchhan Paandey) करण्यात आली.
प्रमोशन दरम्यान, जेव्हा अक्षयला या चित्रपटाच्या नावा विषयी विचारण्यात आले होते तेव्हा त्यानं मस्करीत म्हटलं होतं की अभिषेक बच्चन आणि चंकी पांडे यांना एकत्र पाहिलं होतं आणि त्यामुळे चित्रपटाचं नाव 'बच्चन पांडे' ठेवलं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
हेही वाचा : 'दुसऱ्या बाळासाठी तब्बल 7 वर्ष प्रयत्न केला पण...', राणी मुखर्जीनं सांगितली मनातली खदखद
दरम्यान, बच्चन कुटुंबाविषयी बोलायचे झाले तर त्यांचं खरं आडनाव हे श्रीवास्तव आहे. मग ते बच्चन हे आडनाव कसं लावतात? तर त्याचं कारण असं आहे की अमिताभ यांचे वडील हरिवंशराय हे बच्चन त्यांचं टोपणनाव वापरत होते. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील पदार्पणासाठी असलेल्या नावासाठी त्याचाच वापर करण्यात आला.