मुंबई : 'बचपन का प्यार मेरा' (Bachpan ka pyar) या गाण्यामुळे सहदेव दिरदो (Sahadev Dirdo) रातोरात फेमस झाला. एका व्हीडिओमुळे सर्वांचा चाहता झाला. सहदेवचा 28 डिसेंबरला अपघात झाला. या अपघातात सहदेवला जबर दुखापत झाली होती. सहदेवला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या चाहते नाराज होते. सहदेवच्या प्रकृतीत झपाट्याने सुधार व्हावी, यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. दिलासादायक बाब म्हणजे आता सहदेव दुखापतीतून बऱ्यापैकी सावरला आहे. प्रकृतीत बऱ्यापैकी सुधार झाल्यानंतर सहदेवने इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. (bachpan ka pyar fame sahadev dirdo share video on instagram after recovering accident thankfull all fans and doctor)
 
सहदेवने व्हीडिओत काय म्हंटलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहदेवने या व्हीडिओद्वारे त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 


"तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केलीत, यासाठी धन्यवाद. मी मनापासून डॉक्टर देवेंद्र नाईक यांचा आभारी आहे", अशा शब्दात सहदेवने व्हीडिओद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. या व्हीडिओत सहदेवची प्रकृती उत्तम असल्याचं स्पष्ट होतंय. सहदेव आधीपेक्षा ठणठणीत आहे.    


सहदेवच्या या व्हीडिओवर रॅपर बादशाहने कमेंट केली आहे. सहदेवने कमेंटमध्ये बादशाहचे आभार मानले. सहदेवचा जेव्हा अपघात झाला होता, तेव्हा सर्वात आधी बादशाह मदतीसाठी धावून आला होता. बादशाह सहदेवच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होता. सहदेव आणि बादशाह या दोघांनी एकत्र काम केलं आहे. 


सहदेवने गायलेलं 'बचपन का प्यार' हे गाणं जुलै 2021 मध्ये प्रचंड व्हायरल झालं होतं. या एका व्हीडिओने सहदेव रातोरात प्रसिद्धीझोतात आला होता. सहदेवला मिळालेली प्रसिद्धी पाहून बादशाहने त्याला सोबत रिमीक्स गाणं करण्याची ऑफर दिली होती.