Ram Kapoor Fat to Fit: राम कपूरला आपण अनेक नानाविध भुमिकांमधून पाहिले आहे. त्याचसोबत त्याच्या 'बडे अच्छे लगते हैं' (Bade Acche Lagate Hai) या मालिकेतून आपण त्याला पाहिले आहेच. त्याची आणि साक्षी तन्वरची जोडी या मालिकेतून खूपच लोकप्रिय झाली होती. राम कपूरच्या अभियाचे जेवढे कौतुक होते त्याचबरोबर त्याच्या फॅट टू फीट (Fat to Fit) जर्नीचेही होते. त्यात फारच कमी कालावधीत आपले वजन कमी केले असून त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे (Physical Transformation) खूप कौतुक झाले आहे. राम कपूर हा गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात आहे. त्याच्या अभिनयाच्या वेगळेपणामुळे तो चर्चेत आला होता त्यानंतर त्याच्या वजनामुळे त्याला अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. परंतु त्यावरही त्यानं मात केली आणि आता आपला फॅट टू फीटचा प्रवास तो सगळ्यांसोबत शेअर (Ram Kapoor News) करतो आहे. (Bade acche lagate hai actor ram kapoor weight loss journey will shock you entertainment news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण अनेक सेलिब्रेटींना आपण वजन कमी करत फीट होताना पाहिलं आहे. त्यात राणी मुखर्जी, सारा अली खान (Sara Ali Khan), आलिया भट्ट, आकाश अंबानी अशीही काही मोठी नावं आहे. काहींचे वाढलेले वजन (Fat to Fit Celebrities) कमी होते तर काहींचे कमी झालेले वजनही वाढते परंतु त्यातूनही जिद्दीनं आपल्या फीटनेसकडे (Fitness) लक्ष देणारी ही मंडळी असतात. त्यामुळे आपल्यालाही त्यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित वाटते. एकेकाळी वजनावरून ट्रोल होणारी ही मंडळी आपापल्या कमी झालेल्या वजनानं पुन्हा एकदा ग्लॅमरमध्ये येतात. असंच एक नावं आहे ते म्हणजे राम कपूर यांचे. आपल्या अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकली आहेतच परंतु आता आपल्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनही जिंकली आहेत. 


समोर आलेल्या माहितीनुसार, राम कपूर यांनं इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting) करत आपले वजन कमी केले आहे. यामध्ये 16:8 असे डाएट आहे. म्हणजे हे तास आहे ज्यानूसार आपल्याला आपलं खाण्यापिण्याचे शेड्यूल लावावे लागते. यामध्ये 8 तास खायचे आणि 16 तास फास्टिंग करायचे असे गणित असते. हे डाएट त्यांनी 3 दिवस रेग्यूलर केले. 


आपल्या या डाएटसोबतच त्यांनी व्यायामालाही प्राधान्य दिले. हेवी वेट ट्रेनिंग, कार्डियो आणि मॉर्निंग वॉक याकडे त्यांनी प्राधान्यानं लक्ष दिले.