या टीव्ही अभिनेत्रीचा नवऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
काय आहे हे प्रकरण?
मुंबई : टीव्ही मालिका 'बडे अच्छे लगते है' मधील अभिनेत्री चाहत खन्नाने आपल्या नवऱ्यावर फरहान मिर्जाच्या विरोधात शारिरीक आणि मानिसक शोषणाचा आरोप लावला आहे. चाहतचं असं म्हणणं आहे की, फराह माझ्यावर देह व्यापाराचा आरोप लावत असे. चाहतने या अगोदर ऑगस्ट महिन्यातच फरहानपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती.
चाहतने सांगितलं की, माझं हे फक्त शारिरीक शोषण नव्हतं. तर आर्थिक आणि मानसिक देखील त्रास होता. फरहान कायम माझ्यावर नजर ठेवून असे. मी जेव्हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात असे तेव्हा पण तो माझ्या मागे मागे फिरायचा.
एवढंच नाही तर त्याने माझ्यावर स्वतःच्या भावाला डेट करत असल्याचे आरोप देखील लावले. घरातील या वातावरणामुळे मला वेड लागायची वेळ आली आहे. फरहान माझ्या कामाच्या ठिकाणी अचानक येतो. शुटिंग दरम्यान को-स्टारला हग केलं किंवा हात पकडला तर हा हंगामा करतो.
आजारपणातही करत असे जबरदस्ती
चाहतने फरहानवर आरोप लावताना सांगितलं की, फरहान माझी तब्बेत ठीक नसताना देखील संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असे. मी मरत असेन तरीही त्याला काही फरत पडत नाही असं तिचं म्हणणं आहे. माझ्या दोन्ही गरोदरपणात तो मला विचारत असे की, या दोन्ही मुली माझ्या आहेत? माझ्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर त्याने मला घरी जायला सांगितलं होतं. चाहत सांगत पण हे सगळं मी माझ्या मुलींना घेऊन सहन करत आले. मात्र हे घरगुती वादापेक्षाही भयंकर आहे.