लग्नाआधी प्रेग्नंट, गर्भपातासाठी मागितले 75 लाख; `बाहुबली` फेम राम्यानं पाहिले इतके वाईट दिवस
Bahubali Actress Ramya Krishnan : बाहुबली फेम राम्या कृष्णनं ही एका विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर लग्नाआधीच राम्या प्रेग्नंट होती, अशा अनेक चर्चा सुरु होत्या.
Bahubali Actress Ramya Krishnan : 'बाहुबली' फेम अभिनेत्री राम्या कृष्णनला कोणत्याही ओळखीची गरज नाही. राम्या यांचे आजही लाखो चाहते आहेत. 90 च्या दशकापासून दर्जेदार अभिनयामुळे चर्चेत असणाऱ्या राम्याचं खासगी आयुष्य आजही चर्चेचा विषय ठरतो. राम्याचं नाव एका विवाहित दिग्दर्शकासोबत जोडण्यात आलं होतं. इतकंच नाही तर लग्ना आधी राम्या प्रेग्नंट होती याविषयी देखील चर्चा होत्या. आज राम्याच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...
राम्यानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक के एस रविकुमार यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पदयप्पा' आणि 'पत्तली' या चित्रपटांमध्ये राम्यानं एस रविकुमार यांच्यासोबत काम केलं. तर 2002 मध्ये आलेल्या 'पंचतंत्र' मध्ये एस रविकुमार यांनी राम्याला वेगळ्याच भूमिकेत दाखवले. अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केल्यानं दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, असे म्हटले जाऊ लागले. इतकंच नाही तर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगु लागल्या होत्या. मात्र, एक रविकुमार यांचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आले होते.
रिपोर्ट्सनुसार, ही गोष्ट जेव्हा एस रविकुमार यांच्या पत्नीला कळली तेव्हा त्यांनी राम्याला धमकी दिली. या चर्चा सुरु असताना राम्या प्रेग्नंट झाल्याची बातमी समोर आली होती. या सगळ्या बातम्या समोर येताच एस रविकुमार यांच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. त्यांच्या पत्नीसोबत त्याचं नातं विस्कळीत होऊ लागलं. त्यानंतर एस रविकुमार यांना हे नात संपवायचं होतं. रिपोर्ट्सनुसार, राम्यानं गर्भपात करण्यासाठी 75 लाख रुपये मागितले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं देखील म्हटलं जातं की त्यावेळी ते दोघेही या बाळासाठी तयार नव्हते. त्यानंतर त्यांनी गर्भपाताचा निर्णय घेतला.
हेही वाचा : शिल्पा शेट्टीला बंद करावं लागलं मुंबईतील आलिशान रेस्टॉरंट; समोर आलं कारण
दरम्यान, जेव्हा राम्या आणि रविकुमार यांना त्यांच्या रिलेशनशिप, प्रेग्नंसी आणि गर्भपाताविषयी विचारण्यात आले. तर त्यांनी या सगळ्याचा विरोध केला होता. त्यानंतर राम्यानं 12 जून 2003 रोजी तेलगू दिग्दर्शक कृष्णा वामसीशी लग्न केलं. लग्नाच्या काही काळानंतर राम्यानं एका मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचे नाव रित्विक कृष्णा असे आहे. राम्या आज तिच्या खासगी आयुष्यासोबतच तिच्या कामामुळे चर्चेत असते.