`बाईपण भारी देवा` Real Life Story? लेखिकेनचं केलं त्या `भारी बायां`बद्दलचा खुलासा
Baipan Bhari Deva Real Story: बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यातून या चित्रपटानं एक वेगळीच उंची प्राप्त केली आहे त्यामुळे सध्या भारतातला हा सर्वाधिक बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या चित्रपटांमधील एक चित्रपट ठरला आहे. परंतु या चित्रपटाची खरी स्टोरी नक्की काय आहे?
Baipan Bhari Deva Real Story: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा ही रंगलेली आहे. त्यातून या चित्रपटाची स्टोरीही सध्या गाजते आहे. त्यामुळे या चित्रपटाची विशेष करून चर्चा रंगली आहे. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शन हे केदार शिंदे यांनी केली असली तरीसुद्धा या चित्रपटाची कथा ही वैशाली नाईक यांनी लिहिलं. केदार शिंदेची त्या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. सध्या वैशाली यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष त्यांच्या या पोस्टकडेच वळले आहे. 'बाईपण भारी देवा' याची चित्रपटाची कथा कुठे आणि कशी सुचली यावर त्यांना अनेकांना असे प्रश्न विचारले असतील. परंतु सध्या या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या या पोस्टमध्ये आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात खूप जूने फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्याच सहा बायका आणि त्यांचे विविध फोटो दिसत आहे. हे फोटो साधारणत: 70-80 काळातला असावा.
यावर्षी सर्वाधिक गाजलेला चित्रपट कोणता असेल तर तो आहे 'बाईपण भारी देवा' हा. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे त्यातून 'सैराट' आणि 'वेड' या चित्रपटानंतर मराठीतला हा सर्वाधिक सुपरडुपर हिट सिनेमा आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं 68 कोटींचा गल्ला भरला आहे. या चित्रपटाविषयी आता किती लिहू आणि किती नको असं सर्वांनाच झालेलं असेलच त्यातून या चित्रपटानं आतापर्यंत फार मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. हा चित्रपट प्रत्येकजण रिलेट करतो आहे. त्यामुळे या चित्रपटानं प्रत्येकीच्या मनात घरं केलं आहे. या चित्रपटाची क्रेझही फार वाढली आहे. मराठीसोबतच अमराठी लोकंही हा चित्रपट अगदी आवडीनं पाहाताना दिसत आहेत. या चित्रपटाची खरी कथा कुठून सुरू झाली असावी असा प्रश्नही प्रत्येकाला पडला आहे.
हेही वाचा - मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; 'लग्नानंतर हनिमून आणि मग...'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कथा वैशाली यांच्या जवळच्या बहिणींच्या नात्यावरून आणि आयुष्यावरून बेतलेली आहे. सध्या त्यांनी त्यांच्या बहीणींचा जुना फोटो शेअर केला आहे आणि खाली कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की 'तेव्हा इथूनच सर्वाची सुरूवात झाली होती' आणि पुढे 'बाईपण भारी देवा' असं लिहिलं आहे.
वैशाली यांनीच ही कथा लिहिली आहे आणि त्यांनी मग ही 6 बहिणींची कथी जाऊन केदार शिंदे यांना ऐकवली व त्यानंतर ते चक्क या कथेच्या प्रेमाच पडले आणि पुढे जो आहे तो इतिहासच आहे.